IND vs ENG, Semi Final: जसप्रीत बुमराह नावावर करणार मोठा विक्रम, कपिल देवसोबत बसणार पंगतीत

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. या सामन्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे इतिहास रचण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त एका विकेटची गरज आहे.

| Updated on: Mar 04, 2026 | 5:05 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत भारत आणि इंग्लंड हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे इतिहास रचण्याची संधी आहे. (Photo- BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत भारत आणि इंग्लंड हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे इतिहास रचण्याची संधी आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5

जसप्रीत बुमराहने तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 499 विकेट घेतल्या आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 विकेट पूर्ण करण्यासाठी फक्त एका विकेटची गरज आहे. आतापर्यंत आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या 7 गोलंदाजांना ही किमया साधता आली आहे.  (Photo- BCCI Twitter)

3 / 5

जसप्रीत बुमराहने 52 कसोटी सामन्यांच्या 99 डावात 234 विकेट, 89 वनडे सामन्यात 149 विकेट आणि 93 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 116 विकेट घेतल्या आहेत. आता उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध एक विकेट घेताच 500 विकेटचा टप्पा गाठणार आहे.  (Photo- BCCI Twitter)

4 / 5

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेने 956, रविचंद्रन अश्विनने 765, हरभजन सिंगने 717, कपिल देवने 687, रवींद्र जडेजाने 634, जहीर खानने 610 आणि जवागल श्रीनाथने 551 विकेट घेतल्या आहेत. आता जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली तर 500 विकेट घेणारा आठवा भारतीय गोलंदाज ठरेल.  (Photo- BCCI Twitter)

5 / 5

जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा सर्वात विश्वासाचा गोलंदाज आहे. त्याने अनेक सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे. त्याचा सामना करणं प्रतिस्पर्धी संघांना कठीण जातं. आता उपांत्य फेरीत तशाच कामगिरीची अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे.  (Photo- BCCI Twitter)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us