AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TRP : ‘अनुपमा’ला मागे टाकत ‘या’ लोकप्रिय मालिकेनं पटकावलं पहिलं स्थान

दर आठवड्याला मालिकांच्या टीआरपीची यादी समोर येते. गेल्या अनेक आठवड्यांपासून रुपाली गांगुलीची 'अनुपमा' हीच मालिका अग्रस्थानी होती. परंतु आता या आठवड्यात 'अनुपमा'ला दुसऱ्या एका लोकप्रिय मालिकेनं मागे टाकलं आहे.

| Updated on: Jun 27, 2025 | 12:53 PM
Share
24 व्या आठवड्याची टीआरपीची यादी जाहीर झाली आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर मालिकांच्या निर्मात्यांना मोठा धक्काच बसला आहे. कारण यंदा 'अनुपमा' ही लोकप्रिय मालिका पहिल्या स्थानावरून मागे आली आहे. टीआरपीच्या यादीत 'अनुपमा' या मालिकेची पहिल्या नंबरची जागा दुसऱ्या मालिकेनं घेतली आहे.

1 / 7
'अनुपमा' ही मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहिली होती. रुपाली गांगुलीची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळालं. परंतु या आठवड्यातील या मालिकेचा पहिला क्रमांक दुसऱ्या मालिकेनं हिरावून घेतला आहे.

2 / 7
टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेली ही मालिका दुसरी-तिसरी कोणती नसून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' आहे. गेल्या 17 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. निर्माते असितकुमार मोदी यांच्या या कॉमेडी शोनं 'अनुपमा'सारख्या भावनिक मालिकेला मागे टाकलं आहे.

3 / 7
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या 17 वर्षांत दुसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर आली आहे. हे पाहून शोचे निर्माते खूप खुश झाले आहेत. असितकुमार मोदी यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित आनंद व्यक्त केला आहे.

4 / 7
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेला पहिल्या क्रमांकाचं स्थान दिल्याबद्दल निर्मात्यांनी चाहत्यांचे खूप आभार मानले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत भूताची कथा दाखवण्यात येत होती. त्याच कथेनं प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं होतं.

5 / 7
टीआरपीच्या यादीत 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे. या आठवड्यात या मालिकेला 2.0 रेटिंग मिळालं आहे. तर 'अनुपमा' या दुसऱ्या क्रमांकावरील मालिकेला 2.1 रेटिंग मिळाली  आहे.

6 / 7
टीआरपीच्या यादीत चौथ्या स्थानावर 'उडने की आशा' ही मालिका आहे. या मालिकेला 1.9 रेटिंग मिळाली आहे. तर पाचव्या स्थानावर 'अॅडव्होकेट अंजली अवस्थी' ही मालिका आहे. या मालिकेतील कोर्टरुम ड्रामा प्रेक्षकांना आवडत आहे.

7 / 7
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.