Hardik Pandya ला का दोष देता? मुंबई इंडियन्ससाठी अशुभ ठरतायत, या खेळाडूचे फिफ्टी?
Hardik Pandya : मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा सीजन खूपच खराब ठरलाय. नेतृत्व बदल करुनही काहीही फायदा झालेला नाही. हार्दिक पांड्या टीमला गतवैभव मिळवून देईल ही अपेक्षा फोल ठरलीय. उलट प्रत्येक सामन्यागणिक मुंबई इंडियन्सचा परफॉर्मन्स ढासळतोय.

Hardik Pandya Feature
- आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची स्थिती खराब आहे. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सची टीम शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. 9 पैकी 6 सामने गमावले असून तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्ससाठी एका खेळाडूचे फिफ्टी अशुभ आहेत.
- मुंबई इंडियन्सच्या या प्रदर्शनासाठी हार्दिक पांड्याला जबाबदार धरल जातय. हार्दिक पांड्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे अशी वेळ आल्याच बोलल जातय.
- पण आता जे आकडे समोर आलेत, त्यावरुन असं दिसतय की, फक्त हार्दिक पांड्याला दोष देऊन काही होणार नाही. कारण एकटा या स्थितीला एकटा हार्दिक पांड्या जबाबदार नाहीय.
- मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील एक फलंदाज जबरदस्त खेळतोय. पण त्याचा गेम टीमच्या फायद्याचा ठरत नाहीय. आकड्यानुसार तिलक वर्माच अर्धशतक मुंबईसाठी अशुभ ठरतय.
- आतापर्यंत ज्या 6 सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झालाय, त्यात तिलक वर्माने अर्धशतक झळकालं आहे. जे 3 सामने मुंबई इंडियन्सचे जिंकलेत, त्यात तिलक वर्माने हाफ सेंच्युरी मारलेली नाही.





