PHOTO : पीएम नरेंद्र मोदींनी घेतली टोक्यो पॅरालिम्पिकमधील खेळाडूंची भेट, भेटवस्तू म्हणून मोदींना मिळाली ‘ही’ खास गोष्ट
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: shashank patil
Updated on: Sep 12, 2021 | 4:04 PM
भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर पॅरालिम्पिक्समध्येही भारताचा झेंडा फडकावला. तब्बल 19 पदकं खिशात घालत भारतीय पॅराएथलिट्सनी भारताचं नाव मोठं केलं.
Sep 12, 2021 | 4:04 PM
भारताने पॅरालिम्पिकमध्ये अप्रतिम प्रदर्शन करत ऐतिहासिक कामगिरी केली. एकूण 19 पदकं खिशात घातली. ज्यामध्ये 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे, पदक मिळवण्याच्या स्पर्धेत भारत 24 व्या स्थानावर राहिला.
1 / 4
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टोक्यो पॅरालिम्पिकमधील सहभागी खेळाडूंची भेट घेतली. त्यांना नाश्त्यासाठी बोलवलं होतं. यावेळी खेळाडूंनी त्यांना सर्वांचे हस्ताक्षर असलेला स्टोलही भेट म्हणून दिला.
2 / 4
मोदीजींनी पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंशी याआधी फोनवरुन चर्चा केली होती. त्यानंतर आता प्रत्यक्षात देखील खेळाडूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी नोएडाचे जिल्हाधिकारी आणि रौैप्य पदक विजेते सुहास याथिराज यांचीही भेट घेतली.
3 / 4
सुहाससोबतच मोदीजींनी बॅडमिंटनपटू कृष्णा नगारसह युवा पलक कोहलीशीही बराच वेळ बातचीत केली. भारताने यावेळी बॅडमिंटनमध्ये चार पदकं मिळवली.