ZNMD 15 Years : ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ 15 वर्ष पूर्ण, फरहान अख्तरने शेवटच्या फोटोला खूप सुंदर कॅप्शन दिलय
Zindagi Na Milegi Dobara : बॉलिवूडच्या लक्षात राहणाऱ्या चित्रपटांमध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा समावेश होतो. या चित्रपटाला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी अभिनेता अभय देओलने चित्रपटाशी संबंधित जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटाला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगाचे अभय देओलने काही अनसीन फोटो शेअर केलेत. सोबत भावूक कॅप्शनही दिली आहे.

अभय देओलने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे फोटो शेअर करताना लिहिलय की, चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं. खूप मजा-मस्करी केली. भावनिक क्षण घालवले. प्रेक्षकांसोबत जोडल्याची एक भावना होती. या चित्रपटाकडून जितकं प्रेम आणि सन्मान मिळाला ते शब्दात सांगता येणार नाही.

अभय देओलने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ऋतिक रोशन, फरहान अख्तरसह अनेक स्मरणीय क्षण दिसत आहेत. या फोटोंनी फॅन्सना सुद्धा चित्रपटाच्या जुन्या दिवसांची आठवण करुन दिली आहे.

फरहान अख्तरने सुद्धा चित्रपटाला 15 वर्ष पूर्ण झाली म्हणून इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलेत. पोस्टसह लिहिलय की, '15 वर्ष..आजही प्रत्येक क्षण जगतोय' शेवटच्या फोटोवर जे लिहिलय ते खूप सुंदर वाक्य आहे 'काही प्रवास कायम लक्षात राहतात'

जोया अख्तर या चित्रपटाची दिग्दर्शक होती. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' 15 जुलै 2011 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात आलेला. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीने चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं.