AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मारक न उभारता फुटबॉल खेळण्याला टाईमपास म्हणतात, मनसेचं आदित्य ठाकरेंना उत्तर

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांनी मनसेचा टाईमपास टोळी असा उल्लेख करुन खिल्ली उडवली. त्याला संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

स्मारक न उभारता फुटबॉल खेळण्याला टाईमपास म्हणतात, मनसेचं आदित्य ठाकरेंना उत्तर
शिवसेना विरुद्ध मनसे सामना रंगला
| Updated on: Feb 05, 2021 | 11:20 AM
Share

अक्षय कुडकेलवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई : शिवसेना आणि मनसे (Shiv Sena vs MNS) यांच्यात वीरपन्न गँग विरुद्ध टाईमपास टोळी  (Virappan gang vs Timepass gang)असा सामना रंगला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांनी मनसेचा टाईमपास टोळी असा उल्लेख करुन खिल्ली उडवली. त्याला आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मुळात शिवसेना खंडणी वसूल करते यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी पळ काढत आहे. मनसे टाईमपास टोळी आहे की नाही हा प्रश्न नाही, शिवसेना खंडणी वसूल करते का? हा प्रश्न आहे”, असं संदीप देशपांडे म्हणाले. (MNS Sandeep Deshpande answers to Aaditya Thackeray)

इतकंच नाही तर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास हडपले, तिथे फुटबॉल खेळला जातो. स्मारक न उभारता फुटबॉल खेळण्याला टाईमपास म्हणतात, असा हल्लाबोल संदीप देशपांडे यांनी केला.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

मनसेबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, “ती संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे”

VIDEO संदीप देशपांडे EXCLUSIVE 

मनसेच्या कीर्तिकुमार शिंदेंचं उत्तर 

मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना त्यांच्याच भाषेत रोखठोक उत्तर देत टाईमपास म्हणजे काय असतो, हे सांगितले. औरंगाबादचं नामांतर करण्यात 30 वर्ष फुकट घालवण्याला आणि मुंबईकरांना प्रत्येक निवडणुकीत चांगले रस्ते, शाळा, बगीचे देऊ, असे आश्वासन देऊन वेळकाढूपणा करण्याला टाईमपास म्हणतात, असे कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या ट्विटसमध्ये म्हटले आहे.

मनसेकडून शिवसेनेचा वीरपन्न टोळी असा उल्लेख

“वीरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं होतं.

“मुंबई महापालिकेत वीरप्पन गँग काम करत आहे. ही वीरप्पन गँग महापालिकेची भरमसाठ लूट करत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसंच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ”टीव्ही 9 मराठी’शी बोलताना शिवसेनेवर टीकास्त्र डागलं होतं.

वरुण सरदेसाईंचं उत्तर

“खरे वीरप्पन कोण, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. आपल्यालाही माहित करुन घ्यायचे असेल तर ‘मनसे खंडणी’ असे फक्त google search करुन बघावे. Google च्या पहिल्याच पेजवर या बातम्या सापडतील. सगळ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत, पण प्रत्येक जिल्हातील यांची स्टोरी सेम टू सेम आहे” असं ट्विट वरुण सरदेसाईंनी केलं होतं. सरदेसाईंनी ट्विटमध्ये काही बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या 

ती संघटना आहे की पक्ष मला कळत नाही, आदित्य ठाकरेंकडून मनसेची खिल्ली, टाईमपास टोळी उल्लेख  

मी वीरप्पनबद्दल बोललो, वरुणला का झोंबलं? संदीप देशपांडे-वरुण सरदेसाईंमध्ये ट्विटरवर जुंपली

…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल : संदीप देशपांडे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.