टीव्ही 9 इम्पॅक्ट : वरळीतील झाडांना विषारी इंजक्शन, आदित्य ठाकरेंकडून दखल, होर्डिंगवर कारवाई होणार

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीच्या बातमीची (Aaditya Thackeray on worli tree cutting) दखल घेतली आहे.

टीव्ही 9 इम्पॅक्ट : वरळीतील झाडांना विषारी इंजक्शन, आदित्य ठाकरेंकडून दखल, होर्डिंगवर कारवाई होणार

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीच्या बातमीची (Aaditya Thackeray on worli tree cutting) दखल घेतली आहे. पर्यावरण मंत्र्यांच्या वरळी मतदारसंघात होर्डिंगसाठी झाडे तोडल्याची बातमी टीव्ही 9 ने दाखवली होती. त्या बातमीची दखल घेत आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नवीन होर्डिंग पॉलिसी आणत असल्याचं सांगितलं. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray on worli tree cutting)  म्हणाले, “मी टीव्ही 9 मराठीचा रिपोर्ट बघितला, त्या होर्डिंगवर कारवाई होणार आहे. ज्यांनी झाडांना विषारी इंजेक्शन दिले त्यावर पोलीस केस टाकली आहे. पण मुंबईत आपण नवीन होर्डिंग पॉलिसी आणत आहोत”.

काय आहे प्रकरण?

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी (Tree Cutting In Worli) विधानसभा मतदारसंघात झाडांची कत्तल केल्याचा आरोप आहे. मनसेकडून हा आरोप केला जात आहे. झाडांना विषारी इंजेक्शन देऊन झाडांची कत्तल केल्याचा आरोप मनसेने केला आहे.

एका खाजगी जाहिरात होर्डिंगसाठी माडाच्या झाडांचा (Tree Cutting In Worli) बळी दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी या प्रकरणी स्थानिक महापालिका कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.

वरळी समुद्र किनाऱ्याजवळ ब्लू सी हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाजूला एक सरकारी वसाहत आणि मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे. या परिसरात मुंबई महापालिकेचं एक होर्डिंग आहे. हे होर्डिंग सध्या एका खासगी ठेकेदाराला देण्यात आलं आहे. या नव्या होर्डिंगचं काम सध्या सुरु आहे. या होर्डिंगच्या दर्शनी भागासाठी आसपासच्या परिसरातील झाडांची विषारी इंजेक्शन देऊन कत्तल केली जात असल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी स्थानिक महापालिका कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र, महापालिका याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप आहे.

मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेच्या जंगलातील झाडांची कत्तल होऊ देणार नाही, असं म्हणणाऱ्या पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

संबंधित बातम्या 

पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात झाडांना विषारी इंजेक्शन, मनसेचा आरोप

Published On - 2:17 pm, Tue, 3 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI