गोपीनाथरावांवर आरोप झाले, तेव्हा बाळासाहेबही म्हणाले “प्यार किया तो डरना क्या?” सत्तारांकडून आठवण

"प्यार किया तो डरना क्या?" बाळासाहेबांचे ते शब्द मला लक्षात आहेत" असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. (Abdul Sattar backs Dhananjay Munde)

गोपीनाथरावांवर आरोप झाले, तेव्हा बाळासाहेबही म्हणाले प्यार किया तो डरना क्या? सत्तारांकडून आठवण
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 2:35 PM

औरंगाबाद : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यावर आरोप झाले असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी केलेल्या समर्थनाचा हवाला देत शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची पाठराखण केली. “प्यार किया तो डरना क्या?” हे बाळासाहेबांचे शब्द आजही आपल्याला आठवत असल्याचं सत्तार म्हणाले. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले आहेत. (Abdul Sattar backs Dhananjay Munde remembers how Balasaheb Thackeray supported Gopinath Munde)

“काही वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडेंवरही अशाच प्रकारचे आरोप करण्यात आले होते. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की “प्यार किया तो डरना क्या?” बाळासाहेबांचे ते शब्द मला लक्षात आहेत” असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली.

“अशा व्यक्तींची नावं जाहीर करणं उचित होणार नाही, मात्र भाजप नेतेच ज्यावेळी मला त्यांची नावं जाहीर करायला सांगतील, तेव्ही मी नावांची यादीच देईन. त्यांचीही अशाप्रकारची मूलबाळं आहेत. परंतु त्यांचे नेते जेव्हा नावं विचारतील, तेव्हा मी सांगेन. भाजपच्या अनेक नेत्यांनीही प्रतिज्ञापत्रात अपत्यं लपवली आहेत.” असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.

“धनंजय मुंडे यांनी आपलं प्रेम प्रकरण परस्पर संमतीने असल्याचं सांगितल्यामुळे भाजपने त्याला हवा देण्याची गरज नाही. कोणाच्या वैयक्तिक जीवनावर बोलून राजकारण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा घटना देशभरात घडत असतात. दोघांच्या संमतीने झाल्यास काही हरकत नाही. जर दोघांचे संमतीशिवाय संबंध असते, तर जरुर त्यांची चौकशी करण्याची मागणी आम्ही केली असती. पण धनंजय मुंडेंनी स्वतः याबाबत सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. तसेच या संबंधांबाबत धनंजय मुंडे यांच्या मित्रापरिवाला आणि त्यांच्या कुटुंबियांना माहिती आहे” असंही अब्दुल सत्तारांनी नमूद केलं. (Abdul Sattar backs Dhananjay Munde remembers how Balasaheb Thackeray supported Gopinath Munde)

संबंधित बातम्या 

धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून विचारा करावा लागेल : शरद पवार रोखठोक

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला का? शरद पवार म्हणतात, “आरोप गंभीर…”

(Abdul Sattar backs Dhananjay Munde remembers how Balasaheb Thackeray supported Gopinath Munde)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.