AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election Result | भाजपचे अमरीश पटेल की काँग्रेसचे अभिजीत पाटील धुळे नंदुरबारमध्ये कोण बाजी मारणार?

धुळे नंदुरबार विधान परिषद मतदारसंघात भाजपच्या अमरीश पटेलांसमोर काँग्रेसच्या अभिजीत पाटील यांचं आव्हान आहे. Abhijit Patil Amrish Patel

MLC Election Result | भाजपचे अमरीश पटेल की काँग्रेसचे अभिजीत पाटील धुळे नंदुरबारमध्ये कोण बाजी मारणार?
| Updated on: Dec 03, 2020 | 8:08 AM
Share

धुळे : विधानपरिषदेच्या धुळे -नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी 1 डिसेंबरला 99 टक्के मतदान झालंय. आज (3 डिसेंबर )मतमोजणी होत आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल (Amrish Patel) तसेच भाजप मधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील (Abhijit Patil) या दोघातून कोण बाजी मारतोय हे येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. धुळे-नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचं संख्याबळ पाहता भाजपचं पारडं जड असल्यानं भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास भाजपाच्या गोटातून व्यक्त होत आहे. तर, या निवडणुकीत परिवर्तन होईल असा आशावाद महाविकास आघाडी गटाला आहे. ( Abhijit Patil and Amrish Patel who will win Dhule Nandurbar MLC Constituency)

अमरीश पटेल यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा 30 सप्टेंबर 2019 या दिवशी राजीनामा दिला होता. त्यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी 14 डिसेंबर 2021 या दिवशी पूर्ण होत होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्यानं केवळ 12 महिन्यांचा कालावधी निवडून येणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झालेल्या राजकीय घडामोडींचा या निवडणुकीत भाजपला फायदा होणार की महाविकास आघाडी सरकारला फायदा होणार हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे.

धुळे-नंदुरबार विधान परिषद हा एकच मतदार संघ आहे . काँग्रेसला अलविदा म्हणत भाजपमध्ये आलेल्या अमरीश पटेल यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 12 मार्च 2020 हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. 13 मार्च 2020 ला अर्जाची छाननी झाली. 16 मार्च 2020 या दिवशी निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या जागेसाठी 30 मार्च 2020 ला मतदान प्रक्रिया तर 31मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होता . मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक दोन महिने पुढे ढकलण्यात आली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे धुळे-नंदुरबार विधानपरिषद या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची एकजूट आहे. ( Abhijit Patil and Amrish Patel who will win Dhule Nandurbar MLC Constituency)

कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलली

विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार पोट निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा 12 मार्च 2020 हा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मात्र, कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली गेली. विधान परिषद निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत होत आहे. भाजप तर्फे माजी मंत्री अमरीश पटेल तसेच महाविकास आघाडी तर्फे भाजप मधून काँग्रेस पक्षात आलेले अभिजित पाटील यांच्यात ही लढत आहे. अमरीश पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी ही निवडणूक होत आहे. ( Abhijit Patil and Amrish Patel who will win Dhule Nandurbar MLC Constituency)

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले 412 तर स्वीकृत 28 सदस्य असे एकूण 440 सदस्य मतदानासाठी पात्र आहेत. मात्र, धुळे महानगरपालिकेतील लोकसंग्राम पक्षाच्या सदस्या हेमा अनिल गोटे ,तसेच शिंदखेडा नगरपरिषदेतील भाजपचे स्वीकृत सदस्य राजेंद्र भामरे यांनी राजीनामा दिलाय. धुळे महानगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत सदस्य सोनल शिंदे यांना विभागीय आयुक्तांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने अपात्र ठरविले आहे, त्यामुळे विधान परिषदेसाठी मतदान करणार्‍या सदस्यांची संख्या 437 झाली आहे.

धुळे-नंदुरबार विधान परिषद मतदार संघात भाजपचे 199 काँग्रेसचे 157,राष्ट्रवादी काँग्रेसचे 36, शिवसेनेचे 20, एमआयएमचे 9, समाजवादी पक्षाचे 4, बसपा , मनसेचा प्रत्येकी एक, अपक्ष 10 सदस्य मतदार होते. 437 मतदारांपैकी 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय म्हणजेच 99 टक्के मतदान झालंय. 99 टक्के झालेलं मतदान कोणाचं राजकीय भवितव्य घडवतंय हे येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. ( Abhijit Patil and Amrish Patel who will win Dhule Nandurbar MLC Constituency)

संबंधित बातम्या:

MLC Election Result LIVE Update | विधानपरिषदेच्या सहा जागांचा फैसला, महाविकास आघाडी की भाजपला कौल?

Graduate Constituency Elections LIVE | पदवीधर आणि शिक्षक निवडणूक, कुठे-किती टक्के मतदान?

( Abhijit Patil and Amrish Patel who will win Dhule Nandurbar MLC Constituency)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.