AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘नार्वेकरांनंतर आता परबांच्या रिसॉर्टवर हातोडा’, किरीट सोमय्यांनी सांगितलं कधी होणार कारवाई?

आतापर्यंत एकूण 28 घोटाळे बाहेर आले आहेत. येत्या महिन्याभरात 4 मंत्र्यांचे 4 नवे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला आहे.

Video | 'नार्वेकरांनंतर आता परबांच्या रिसॉर्टवर हातोडा', किरीट सोमय्यांनी सांगितलं कधी होणार कारवाई?
किरीट सोमय्या
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 3:41 PM
Share

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्यावर टीका केली आहे. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यानंतर आता अनिल परब यांच्या रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडेल, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. अनिल परब यांनी अनधिकृतपणे सीआरझेडमध्ये (CRZ) बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आता लवकरच या बेकायदेशीर (Illegal) रिसॉर्टवर हातोडा पडेल, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ठाकरेंकडून परबांना वाचवण्याचे प्रयत्न?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना वाचवण्याची खूप प्रयत्न केले असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. पर्यावरण मंत्रालयानं अनिल परब यांना नोटीस पाठवली असून त्यांना 3 तारखेपर्यंत या नोटिसीला उत्तर द्यावं लागणार असल्याचंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. 5 ते 7 तारखेपर्यंत रिसॉर्ट तोडण्याचे आदेश राज्य सरकारकडे येतील, असं भाकितही किरीट सोमय्या यांनी केलंय.

दरम्यान, अनिल परब यांचं रिसॉर्ट तुटण्यासोबत त्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून याचीही चौकशी केली जावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पाडण्याचा आदेश निघाल्यानंतर आम्ही राज्यपालांकडे अनिल परबांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. तर अनिल परबांची आमदारकी रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचही सोमय्या म्हणालेत.

उद्धव ठाकरेंवर घणाघात

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अनिल परबांच्या अनधिकृत रिसॉर्टकडे कुणाचं लक्ष जाऊ नये, त्याची चर्चा होऊ नये, यासाठी नवाब मलिकांना कामाला लावलं असल्याचा टोला लगवालाय.

18 नेते आणि मंत्री यांची चौकशी आणि कारवाई सुरु आहे. आतापर्यंत एकूण 28 घोटाळे बाहेर आले आहेत. येत्या महिन्याभरात 4 मंत्र्यांचे 4 नवे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला आहे.

काय आहे बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरण?

परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणात सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यादरम्यान, दापोलीतील अनिल परबांच्या रिसॉर्ट (Dapoli Resort) प्रकरणी बिगरशेती परवाना रद्द केल्याचं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारने लोकायुक्तांकडे सादर केलं होतं. सुरुवात देण्यात आलेला परवाना हा फसवणुकीनं घेण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला होता. परब यांचे दापोलीतील दोन रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

यातील एका रिसोर्टचं नाव साई रिसोर्ट ऍनेक्स असं आहे. तर दुसऱ्याचं नाव सी-कॉन्च रिसोर्ट असं असून हा रिसॉर्ट आपल्या मालकीचा असल्याचं लपवण्याचा परब यांचा प्रयत्न आहे. हे दोन्ही रिसोर्ट अनधिकृत असल्याचं केंद्राच्या टीमने राज्य सरकारने सांगितलं होतं. दोन्ही रिसोर्टमध्ये सीआरझेडचा भंग झाला आहे. पण सरकारने केवळ साई रिसोर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. दुसरा रिसोर्ट वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे. पण आम्ही या रिसोर्टवर कारवाई करायला लावूच, असा दावाही सोमय्या यांनी केला होता.

पाहा व्हिडीओ – काय म्हणाले सोमय्या?

इतर राजकीय बातम्या –

Sindhudurg : नितेश राणेंच्या बालिशपणाने कोकणाची मान खाली गेली-विनायक राऊत

अध्यापक विकास संस्था शहाण्यांना अधिक शहाणं करणार; सुपेंबद्दल अजितदादा नेमकं काय म्हणाले?

Crisis in Uttarakhand BJP|उत्तराखंडमध्ये भाजपची बोट हेलकावे का खातेय? दोन वजनदार मंत्री, 4 आमदारांनी पक्ष का सोडला?

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.