नगरमध्ये सेना-भाजप कट्टर विरोधक, मग युती कशी होणार?

अहमदनगर: राज्यात शिवसेना भाजपची युती झाली असली, तरी अहमदनगरला मात्र अजूनही युतीचे चिन्ह दिसत नाही. महापालिका निवडणुकीनंतर देखील स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे जास्त उमेदवार असूनही  सभापती होऊ शकला नाही. कारण भाजप आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने पालिकेत बसपाचे मुदस्सर शेख हे निवडून आले आहेत. तर सेनेच्या योगीराज गाडे यांना पराभव स्वीकारावा लागला. अहमदनगरला शिवसेना भाजपाचे वैर अजून संपता संपत …

नगरमध्ये सेना-भाजप कट्टर विरोधक, मग युती कशी होणार?

अहमदनगर: राज्यात शिवसेना भाजपची युती झाली असली, तरी अहमदनगरला मात्र अजूनही युतीचे चिन्ह दिसत नाही. महापालिका निवडणुकीनंतर देखील स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे जास्त उमेदवार असूनही  सभापती होऊ शकला नाही. कारण भाजप आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने पालिकेत बसपाचे मुदस्सर शेख हे निवडून आले आहेत. तर सेनेच्या योगीराज गाडे यांना पराभव स्वीकारावा लागला.

अहमदनगरला शिवसेना भाजपाचे वैर अजून संपता संपत नाही, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड आणि खासदार दिलीप गांधी यांचे मन अजूनही जुळत  नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत नगरला भाजप-सेनाच एकमेकांचे प्रमुख विरोधक असणार यात शंका नाही.

दुसरीकडे पालिकेचे पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अविनाश घुले यांनी माघार घेत बसपाला साथ दिली. भाजप ३, राष्ट्रवादी ५, काँग्रेस १ आणि बसपा १ अशी दहा मते मिळवून मुदस्सर शेख विजयी झाले.शिवसेना उमेदवार योगीराज गाडे यांना सहा मते मिळाली.

दरम्यान, महापौर निवडणुकीत शिवसेनेविरोधात झालेली आघाडी या निवडणुकीतही कायम राहिली आहे. विशेष म्हणजे भाजप-सेनेची राज्यात युती झाल्यानंतरही नगरमध्ये शिवसेना एकाकी पडली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सेना भाजप एकमेकांना मदत करणार की विरोध असा प्रश नगरकरांना पडला आहे.

संबंधित बातम्या 

युतीचा पहिला झटका चंद्रपुरातून, शिवसेना आमदाराचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित!   

पुण्यात शिवसेनेचं अजब लॉजिक, युती झाली, मग आता सत्तेत वाटा द्या!    

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *