अहमदनगर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता, शिवसेनेचा महापौर, राष्ट्रवादीचा उपमहापौर बिनविरोध

महापौरपदासाठी भाजपकडे उमेदवार नव्हता तर उपमहापौर पदासाठी देखील त्यांनी रस दाखवला नाही. त्यामुळे या निवड प्रक्रियेची केवळ औपचारिकता राहिली होती.

अहमदनगर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता, शिवसेनेचा महापौर, राष्ट्रवादीचा उपमहापौर बिनविरोध
अहमदनगर महापौर रोहिणी शेंडगे उपमहापौर गणेश भोसले

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अहमदनगरच्या महापौरपदी (Ahmednagar Mayor Election) शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे (Shivsena Rohini Shendage) यांची, तर उपमहापौरपदी गणेश भोसले (NCP Ganesh Bhosale) यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोघांचेही एकमेव अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या सभेत दोघांच्याही बिनविरोध निवडीची घोषणा केली. (Ahmednagar Shivsena Rohini Shendage becomes Mayor NCP Ganesh Bhosale Deputy Mayor)

भाजपकडे उमेदवारच नाही

अहमदनगर महापालिकेचे महापौर पद हे अनुसूचित जाती साठी रखीव होते. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी झाली. त्यामुळे दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज दाखल झाले होते. महापौरपदासाठी भाजपकडे उमेदवार नव्हता तर उपमहापौर पदासाठी देखील त्यांनी रस दाखवला नाही. त्यामुळे या निवड प्रक्रियेची केवळ औपचारिकता राहिली होती.

निवडीनंतर महापौर म्हणतात…

ही औपचारिकता पीठासीन अधिकाऱ्यांनी पार पाडली. शहरातील महिलांच्या आरोग्यावर आणि पाणी प्रश्नावर काम करणार असल्याचं नवनिर्वाचित महापौरांनी सांगितलं तर शहराला हरित करण्यासाठी काम करणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितलं.

शिवसेनेत अंतर्गत राडा

दरम्यान, अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीच्या आदल्या रात्रीच शिवसेनेच्या दोन गटात राडा पाहायला मिळाला होता. महापौर निवडीवरुन अहमदनगरमधील शिवसेना नगरसेवकांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वादावादी झाली. यावेळी शिवसेना नगरसेविकेचे पती निलेश भाकरे यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे.

भाजपला धक्का

याआधी अहमदनगर महापालिका निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. गतवेळी राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी महापौरपदी बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौरपदी मालन ढोणे यांची निवड करण्यात आली होती. परंतु आता सांगली आणि जळगाव पाठोपाठ भाजपने (BJP) तिसरी महापालिका गमावली. अहमनगर महापालिकेतही महाविकास आघाडी पॅटर्न आल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना- 23
राष्ट्रवादी-18
भाजप-15
काँग्रेस-5
बसपा-4
सपा-1
अपक्ष-2

एकूण – 68

संबंधित बातम्या :

VIDEO | अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेच्या दोन गटात राडा

सांगली, जळगावनंतर भाजपला अजून एक धक्का, अहमदनगर महापालिकेत महाविकास आघाडी पॅटर्न

अहमदनगर महापौरपदासाठी सेना-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

(Ahmednagar Shivsena Rohini Shendage becomes Mayor NCP Ganesh Bhosale Deputy Mayor)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI