Ajay baraskar maharaj | अखेर फडणवीसांसोबतच्या फोटोवर अजय बारसकरांच स्पष्टीकरण, जरांगेंनी केलेला आरोप,

Ajay baraskar maharaj | "प्रसाद लाड यांनी नटसम्राट म्हणून टीका केली. नटरंग सिनेमा बघितला असेल, तर लक्षात येईल. हा तुमचा अपमान नाही, तुमच्यामागे असलेल्या मराठा समाजाचा अपमान आहे. तुमच्यामुळे मराठा समाजाला खालच्या दर्जाची वागणूक मिळते, तुमच्यामुळे मराठा समाजाची छी, थू होते" अशी टीका अजय बारसकर यांनी केली.

Ajay baraskar maharaj | अखेर फडणवीसांसोबतच्या फोटोवर अजय बारसकरांच स्पष्टीकरण, जरांगेंनी केलेला आरोप,
Ajay Baraskar
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 1:17 PM

Ajay baraskar maharaj | “समाज एक झालाय. त्यासाठी थांबायला हवं. पण माझ्यावर जरांगेंनी जे व्यक्तीगत आरोप केलेत, त्यासाठी त्यांनी माफी मागावी. मी थांबतो. मी निरोप पाठवलेला. पण त्यांनी अजून माफी मागितलेली नाही. मी त्यांना जे प्रश्न विचारले, हे सगळे प्रश्न आरक्षणासंबंधी होते. त्यांनी एकाही प्रश्नाच उत्तर दिलं नाही. त्यांच्या कुठल्या प्रवक्त्याने उत्तर दिलं नाही. खंडन केलं नाही” असं अजय बारसकर म्हणाले. “मी काय प्रश्न विचारलेला? मी आपल नेतृत्व मान्य केलं. पारदर्शकतेचा मुद्दा होता. तुम्ही सातत्याने भूमिकेत बदल करता. आपल नेतृत्व अपरिपक्व आहे, हे सांगितलेलं. या मुद्यावर कोणी बोलत नाही” असं अजय बारसकर म्हणाले.

“याउलट मला शिवागीळ केली. ट्रोल करुन जीवे मारण्याची धमकी दिली. असे सगळे प्रकार झाले. मी जी भूमिका घेतली, त्याच्याशी मराठा समाजातील अनके जण सहमत आहेत. मी कोणाला काहीही म्हटलेलं नाही. उपोषण करायचय करा. सत्य समजलं ते मी सांगितलं. प्रश्न उपस्थित केले. आक्षेप घेतला. म्हणून माझ्यावर बलात्कार, 300 कोटीची संपत्ती जमवल्याचा तसेच सरकारकजून 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप झाला. मी म्हटलं पुराव द्या” असं अजय बारसकर म्हणाले.

‘तुमच्यामुळे मराठा समाजाची छी, थू होते’

“काल झाला, तो तमाशा होता, विवेकी माणसं कालच्या प्रकाराला तमाशा म्हणतील. नेतृत्वाची अपरिपक्तवता समोर आली. सगळ्या समाजाने पाहिलं. मी जे आरोप केले, ते त्यांनी कबूल केले. मग आम्ही इंग्रजीत सांगत होतो का? अतातयीपणा, हेकेखोरपणा केला, तो त्यांनी कबूल केला. मी विचार करुन निर्णय घेतला नाही, असं ते म्हणाले. मग आम्ही काय पंजाबी भाषेत बोलतो होतो का? काल कोटीची सभा असणारा समाज आज 200 लोकांवर आला. याआधी एकही नेता तुमच्यावर टीका करत नव्हता. कालपासून तुमच्यावर प्रचंड टीका सुरु झाली. प्रसाद लाड यांनी नटसम्राट म्हणून टीका केली. नटरंग सिनेमा बघितला असेल, तर लक्षात येईल. हा तुमचा अपमान नाही, तुमच्यामागे असलेल्या मराठा समाजाचा अपमान आहे. तुमच्यामुळे मराठा समाजाला खालच्या दर्जाची वागणूक मिळते, तुमच्यामुळे मराठा समाजाची छी, थू होते” अशी टीका अजय बारसकर यांनी केली.

‘का लाचार कुत्रा आहे?’

“माझ्यावर आरोप केले की, बारसकर फडणवीसांचा माणूस आहे. माझा आणि फडणवीसांचा काय संबंध? हे फडणवीसांचे समर्थक, पिल्लू असे आरोप माझ्यावर केलेत. माझा फडणवीसांसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, त्याबद्दल मी आभार मानतो, मी हा फोटो शोधतच होतो. या फोटोतील मंडळी पुण्यातील आहे. त्यांना विचारा, आम्ही फडणवीसांची भेट का घेतली? निवडणुकीची तिकीट मागायला गेलो होतो का? मी त्यांचा कार्यकर्ता आहे की, पदाधिकारी? का लाचार कुत्रा आहे? या लोकांना विचारा. मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी 2017 साली फडणवीसांची भेट घेतलेली. भेट घ्यावीच लागते. आरक्षण मारुतीच्या मंदिरात बसून मिळत नाही. सरकार दरबारात, न्यायालयात जावं लागत” असं अजय बारसकर म्हणाले.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.