Ajit Pawar LIVE : शरद पवारांचा काडीचा संबंध नाही, अजित पवारांना अश्रू अनावर

अजित पवारांनी (Ajit Pawar press conference ) आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडलं. 

Ajit Pawar LIVE : शरद पवारांचा काडीचा संबंध नाही, अजित पवारांना अश्रू अनावर
Follow us
| Updated on: Sep 28, 2019 | 4:35 PM

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar press conference ) यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या कारणाबाबत उत्सुकता होती. अजित पवार राजीनाम्यानंतर गायब होते.  मात्र आज  दुपारी 1 च्या सुमारास अजित पवार (Ajit Pawar press conference) शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याआधी खुद्द शरद पवार हे पुण्यावरुन मुंबईतील घरी सिल्व्हर ओकला पोहोचले. शरद पवारांच्या घरी पवार कुटुंबीयांची बैठक झाली. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत माहिती देऊ असं सांगितलं.

अजित पवारांनी (Ajit Pawar press conference ) आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडलं.

माझ्या सदसदविवेकाला जागून राजीनामा दिला. या निर्णयाने पक्षातील अनेकांना दुःख झालं. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा झाला तेव्हाही असंच झालं होतं. मी जर कुणालाही सांगितलं असतं तर त्यांनी मला निर्णय घेऊ दिला नसतो. त्यांना दुखावलं म्हणून मी त्यांची माफी मागतो,  अजित पवार म्हणाले.

मी शक्यतो सर्व गोष्टी शरद पवारांना सांगतो. मात्र, शरद पवारांना या वयात त्रास झाल्याने मी कुणालाही न सांगता राजीनाम्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी माझा फोन बंद करुन ठेवला. काल मी मुंबईतच नातेवाईकांकडे होतो. हे 2010 चं प्रकरण आहे. ते आज निवडणुकीच्या काळातच का आणलं गेलं, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

माझ्या सदसदविवेक बुद्धीला स्मरुन राजीनामा दिला. त्यामुळे आमचे कार्यकर्ते, हितचिंतक असतील , या सर्वांना वेदना झाल्या. त्यांना कळलं नाही की मी न विचारता राजीनामा  का दिला. असाच प्रसंग मागे उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाला होता. मी सांगू इच्छितो की असा प्रसंग येतो तेव्हा, जयंतराव, भुजबळ, तटकरे किंवा दिग्गज नेत्यांना सांगितलं असतं. ती माझी चूक होती की नव्हती, त्याच्या खोलात मी जात नाही. त्यांना मी न सांगता हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो.

मी 5.30 ला विधानभवनात गेलो. सागर म्हणून सेक्रेटरी होते. तीन दिवसापूर्वी हरिभाऊ बागडेंना फोन केला होता. मुंबईत कधी असणार याची विचारणा केली होती. राजीनाम्याची भावना माझ्या मनात येत होती. मात्र निवडणुका असल्यामुळे पक्षाला, सहकाऱ्यांना अडचणीत आणणं योग्य आहे का ही भावनासुद्धा माझ्या मनात होती.

खरं म्हणजे आम्ही सर्वजण महाराष्ट्र राज्य बँकेत संचालक म्हणून कार्यरत होतो. आमचं बोर्ड बिनविरोध निवडून आलं होतं. मी पुण्यातून प्रतिनिधीत्व करण्यापूर्वी वळसे पाटील होते. आज सर्वच पक्षाचे प्रतिनिधी, सहकारी त्या बोर्डात होते. त्या बोर्डावर कारवाई करण्यात आली. तो त्यावेळचा निर्णय होता. त्याची चौकशी सुरु होती. सभागृहात विविध उत्तरं देत होते. संबंधित खात्याच्या सहकार मंत्र्यांनी सांगितलं 1 हजार 88 कोटी रुपयांची अनियमितता झाली अशी माहिती सभागृहात दिली. त्याचे पेपर माझ्याकडे आहेत.

देशातील कुणालाही जनहित याचिका करण्याचा अधिकार आहे. अशाच एका जनहित याचिकेत 25 हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला. त्या बँकेत साडेबारा हजार कोटीच्या ठेवी आहेत. अशा बँकेत 25 हजार कोटीचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो. 30 वर्ष मी राजकारणात आहे. बारामतीचं प्रतिनिधित्व करतो आहे. जे काम आम्ही केलं तेच काम बँक अस्तित्वात आल्यापासून अनेक दिग्गजांनी केलं आहे. या बँकेत चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक लोक आहेत.

मागील काही काळात 4 कारखान्यांना कोणतीही मदत करता येत नव्हती. त्यांच्यावर एनपीए होता. तरिही राज्य सरकारने नियमाच्या बाहेर जाऊन यांना मदत केली. अर्थसंकल्पात याची तरतूद केली. अशाप्रकारे कारखान्यांना मदत करावी लागते. जे कर्ज आम्ही दिलं ते फेडलेलं आहे. त्याला राज्य सरकारची गॅरंटी आहे. राज्य सरकारनेच सांगितलं की आधी कारखाने विका आणि जे पैसे राहतील ते आम्ही देतो.

100 कोटीपेक्षा अधिकचं हे प्रकरण असल्याने ते ईडीकडे गेले. ते कोणत्याही साखर कारखान्यावर पदाधिकारी नाही. असं असताना परवा शरद पवारांसह 70 जणांच्या नावे गुन्हे दाखल झाल्याच्या बातम्या केल्या गेल्या. माझ्यामुळे शरद पवारांची बदनामी होते आहे. ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहचलो त्यांनाच माझ्यामुळे त्रास होतो आहे हे पाहून मी अस्वस्थ झालो. त्यामुळे मी याच्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

सहकारी कारखाने अडचणीत आले तर आपल्याला मदत करावी लागले, या सरकारने चार सहकारी कारखान्यांना (धनंजय महाडिक, पंकजा मुंडे, कल्याण काळे यांचे कारखाने) मदत केली, तो सरकारचा अधिकार आहे : अजित पवार

घोटाळ्याबाबत सतत आमच्याचबाबत बातम्या येतात, साहेबांमुळे मी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो, पण आपल्यामुळे त्या माणसाचं नाव येतं हे पाहून व्यथित झालो, राजीनामा देऊन यातून बाहेर पडलं पाहिजे ही भावना मनात होती : अजित पवार

माझा सांगण्याचा अर्थ एकच आहे, की मी कधीतरी बैठकीला जायचो, आम्ही वाटप केलेलं सर्व कर्ज फिटलेलं आहे, कोणतंही कर्ज थकलेलं नाही : अजित पवार

वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देतोय हे विधानसभाध्यक्षांना सांगितलं, मी सिल्वर ओकला का गेलो नाही हे अनेकांनी विचारलं, पण बारामतीत पूरस्थिती होती, दिवसभर मी तिथे होतो, रात्री उशिरापर्यंत लोकांना मदत केली : अजित पवार

शरद पवारांचा काडीचा संबंध नाही

शरद पवारांचा या प्रकरणात कोणत्याही काडीचा संबंध नाही. ते कोणत्याही सहकारी बँकेवर संचालक नाहीत.  25 हजार कोटींचा घोटाळा झाला म्हणतात, बँक नफ्यात आहे, घोटाळा झाल्यावर बँकेला नफा कधी होतो का? आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत, 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम असल्याने साहजिकच ईडीकडे प्रकरण गेलं, पण पवार साहेबांचा काडीचाही संबंध नाही : अजित पवार

चौकशी होत असते, पण 2011 चं प्रकरण आणि ते निवडणुकीच्याच तोंडावर पुढे कसं आलं? सरकार म्हणतं कोर्टाने निर्णय दिला, कोर्टाच्या अधिकाराबद्दल मला आदर आहे, पण या सर्व गोष्टीतून मी अस्वस्थ आहे, त्यामुळेच राजीनामा दिला : अजित पवार

या सर्व उद्विग्नतेतून मी साहेबांनाही न सांगता राजीनाम्याचा निर्णय घेतला, त्यानंतर फोन बंद केला, मुंबईतच एका नातेवाईकांच्या घरी होतो, साहेबांची बदनामी माझ्यामुळे या वयात झाली, त्यात माझाही दोष आहे : अजित पवार

हरिभाऊ बागडेंनी मला राजीनामा का दिला हे विचारलं, मात्र मी सांगितलं नाही. त्यांना मी वैयक्तिक कारण असल्याचं सांगितलं. माध्यमांनी मुंबईत असताना पवारांना का भेटले अशी बातमी रंगवली. मात्र, मी बारामतीचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तेथे मदत कार्य पाहण्यासाठी मी पुण्याला गेलो. मुंबईत शरद पवारांच्या सिल्व्हर ओकला जाण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहतूक कोंडीची अडचण आली.

कौटुंबीक कलह नाही

आमचे थोरले काका शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. शरद पवार हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. ते जे म्हणतात ते अंतिम असतं. मी राजकारणात आलो, सुप्रिया सुळेंच्या राजकारणातील प्रवेशाच्या वेळी, पार्थच्या वेळी आणि आता प्रदेशाध्यक्षांनी रोहितला संधी दिली तर अशीच चर्चा केली जाते. शरद पवारांनी मला भेटण्याबाबत विचारणा केली आणि ते आज मुंबईत आले. त्याच्याकडे माझी भूमिका सांगितली. त्यांनी मला जे सांगायचं होतं ते सांगितलं. त्यांनीच मला पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे भूमिका मांडण्यास सांगितले.

चौकशी किती चालवायच्या?

चौकशा किती वर्ष चालवाच्या हे चौकशी करणाऱ्याच्या हातात आहे. त्यातही आमचंच नाव घेतलं जातं.

वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी वेगवेगळ्या बातम्या दिल्या. त्याची मी तयारी ठेवली होती. राजीनामा दिल्यानंतर कोठेतरी शांतपणे बसावं म्हणूनच काल मी नातेवाईकांकडे थांबलो. पक्षातून अनेकजण गेले. त्यात आम्ही कमी पडलो असं मी समजतो. मी कधीही व्यक्तिगत टीका केली नाही.

संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी स्वतः सभागृहात 1088 कोटींची अनियमितता असल्याचं (नियमबाह्य कर्ज दिल्याचं) सांगितलं आहे. तरीही राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप केला

शरद पवारांचा निर्णय अंतिम

शरद पवारांनी मला भेटीच्या शेवटी पुढील काळात ते जो निर्णय घेतील तो ऐकावं लागेल, असं सांगितलं. मी मान हलवली, पवारसाहेबांच्या नजरेला नजर न मिळवता निघून आलो. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी अंतिम राहिल. शरद पवारांना या वयात ईडीच्या कार्यालयात जावं लागत आहे. संचालक मंडळात अजित पवारांचं नाव नसतं तर हे प्रकरण उभं राहिलं नसतं. माझ्या नावामुळे शरद पवारांना त्रास झाला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचा प्रमुख म्हणून काही अनियमितता आढळल्यावर चौकशी लावली हा त्यांचा अधिकार आहे. मुद्दा इतकाच आहे की ही चौकशी लवकर संपवून जे आहे ते सांगितलं पाहिजे. – अजित पवार

जयंत पाटील काय म्हणाले?

अजित पवारांनी काल विधानसभेचा राजीनामा दिला. शरद पवारांनी ईडीच्या चौकशीला सामोरं जाण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते मुंबईत आले. त्यानंतर संध्याकाळी अजितदादांचा राजीनामा सादर झाल्याची बातमी आली. पवारसाहेबांसंदर्भात ईडीबाबत ज्या बातम्या येत होत्या, त्या आपण पाहिल्या. अजितदादांसोबत 30 वर्षांपासून काम करतोय. दादा स्पष्टवक्ते, काटेकोर निर्णय घेणारे आणि तेवढेच भावूक आहेत. पवारसाहेबांबाबत ज्या मागच्या दोन तीन दिवसातील घटना, त्यातील पोलपणा, कोतेपणा महाराष्ट्राने पाहिला. पण आपल्या कुटुंबप्रमुखाला, महाराष्ट्र आणि देशाच्या मोठ्या नेत्याला, दोन-तीन दिवस लोकांनी पाहिलं. त्यामुळे व्यतित होऊन, अजितदादा भावनाप्रदान किती आहेत, हे आपण पाहिलं. त्यावर अजितदादा म्हणणं मांडण्यासाठी आले.

धनंजय मुंडे – काही लोक न्यायालयात सारखे जनहित याचिका दाखल करुन आमच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामागे सरकारमधील कोण आहेत हे तुम्ही पाहा.

संबंधित बातम्या 

Ajit Pawar Update LIVE : संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.