गर्दी जमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर ही वेळ यावी हे तर महाराष्ट्राचे दुर्दैव; अजितदादांचा खोचक टोला का?

पितृपक्ष असल्याने बर्‍याच मंत्र्यांनी कार्यभारच स्वीकारला नाही असं कळतं. बरेच मंत्री मंत्रालयाच्या कार्यालयात गेले नाहीत. याबाबत बातम्यांचे कात्रण दाखवत अजित पवार यांनी असं कुठे असतं का? जग कुठे चाललंय याकडेही जनतेचे लक्ष वेधले.

गर्दी जमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर ही वेळ यावी हे तर महाराष्ट्राचे दुर्दैव; अजितदादांचा खोचक टोला का?
गर्दी जमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर ही वेळ यावी हे तर महाराष्ट्राचे दुर्दैव; अजितदादांचा खोचक टोला का?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 5:26 PM

मुंबई: पैठण येथील सभेला गर्दी जमवण्याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना अंगणवाडी सेविकांना, मदतनीस, पर्यवेक्षिकांना उपस्थित राहण्याचे पत्र काढावे लागते. ही वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली असेल तर ते महाराष्ट्राचे (maharashtra) दुर्दैव आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. पैठण येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेला येण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने अंगणवाडीसेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांना लेखी स्वरूपात पत्र काढत आदेश दिला जातो याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित विभागाचे पत्रच अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. मंत्र्यांच्या निर्देशाशिवाय अधिकारी आदेश काढू शकत नाहीत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हिवाळी अधिवेशनापर्यंत उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमी आहे. आमदारांची नाराजी वाढेल. पालकमंत्री नेमलेले नाहीत. पालकमंत्र्यांच्या यादीत इच्छूकांची संख्या जास्त असल्याने या नेमणूका रखडल्या आहेत.

राज्यावर अनेक संकटे येत आहेत. नुकतीच अतिवृष्टी आणि आता ढगफुटी झाली. धरणाचे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे त्याखालील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे याकडे लक्ष द्यायला कोण आहे. कुणावरतरी जबाबदारी नेमायला हवी होती, असं अजित पवार म्हणाले.

कारभाराचा धिक्कार

स्वातंत्र्यदिनी 20 लोकांना झेंडावंदन करता आले इतर 16 ठिकाणी प्रशासकीय अधिकार्‍यांनी झेंडावंदन केले हे लोकशाहीमध्ये मान्य होणारी गोष्ट नाही. कारण लोकांनी निवडून दिलेल्या लोकांना नेमा परंतु जो काही कारभार सुरू आहे त्या कारभाराचा धिक्कार व निषेध अजित पवार यांनी यावेळी केला.

तेही बोलले नाही

दिल्लीमध्ये दोन दिवसाचे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांनी मार्गदर्शन केले. शिवाय इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. आमच्या राज्याच्यावतीने आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याची भूमिका मांडली. या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेते व प्रदेशाध्यक्ष यांनी बोलणं अपेक्षित असतं त्यामुळे मी बोलणं टाळलं असे स्पष्ट करतानाच माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला.

वास्तविक मला तिथे कुणी बोलू नका असं सांगितलं नाही. मीच माझी भूमिका त्याठिकाणी घेतली. मी एकटाच बोललो नाही असं नाही तर वेळेअभावी सुनील तटकरे, खासदार वंदना चव्हाण बोलू शकले नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

दोनवेळा वॉशरुमला गेलो म्हणून

दोनवेळा वॉशरुमला गेलो म्हणून वेगळा विषय चालवण्यात आला. कारण नसताना गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. वस्तुस्थिती आधारित बातम्या देण्याची जबाबदारी माध्यमांची आहे मी राज्यात गेल्यावर माध्यमांसमोर बोलणार आहे असेही सांगितले होते. 1991 ला खासदार झालो म्हणजे 31 वर्षे झाली तेव्हापासून सहसा मी राष्ट्रीय पातळीवर उपस्थित राहतो.

परंतु मी मार्गदर्शन करत नाही. राज्यात सभा, अधिवेशनात मी बोलतो माझी भूमिका स्पष्ट करतो. त्यामुळे तुमचे गैरसमज दूर करुन राज्यासमोरचे सध्याचे प्रश्न व राज्यसरकारची चुकीचे धोरणं मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

हे काय बिहार – युपी आहे का?

राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न असताना आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला असताना ठाकरे व शिंदे गटात हाणामारी झाल्याचे समजले. कुणीपण उठतो आणि रिव्हॉल्व्हर काढतो… हे काय बिहार – युपी आहे का? असा सवाल करतानाच मला या राज्यांची बदनामी करायची नाही.

नाहीतर म्हणतील या राज्याची बदनामी करतोय परंतु एका सत्ताधारी पक्षाचा आमदार असं करायला लागला तर राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? गृहमंत्री काय करत आहेत? पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नाही.राज्याच्या हिताचे नाही असे खडेबोलही अजित पवार यांनी सुनावले.

हे काय चाललंय?

मध्यंतरी एका आमदाराने तंगड्या तोडण्याची भाषा केली होती त्यावेळी विधानसभेत या वर्तनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या आमदारांना समज द्यावी असे सांगितले होते. परंतु तरीसुद्धा तोच प्रकार सुरु आहे. हे काय चाललंय? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

मी नास्तिक नाही, पण…

मी नास्तिक नाही परंतु राज्याच्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने दर्शनासाठी किती वेळ घालवायचा त्यालापण काही मर्यादा असतात. आपल्या राज्यात पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा होतोय असं नाही असा टोला लगावतानाच मिरवणूका किती काळ चालवायच्या याला काही बंधने असावीत. आवाजाची मर्यादा नव्हती. 36 तास मिरवणूका चालल्या याकडेही सरकारचे लक्ष वेधले.

यांचा पितृपक्षाने कार्यभार अडलाय…

पितृपक्ष असल्याने बर्‍याच मंत्र्यांनी कार्यभारच स्वीकारला नाही असं कळतं. बरेच मंत्री मंत्रालयाच्या कार्यालयात गेले नाहीत. याबाबत बातम्यांचे कात्रण दाखवत अजित पवार यांनी असं कुठे असतं का? जग कुठे चाललंय याकडेही जनतेचे लक्ष वेधले.

मंत्रालयात हजारो फाईली तुंबल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडे प्रचंड कामाचा ताण असतो आणि त्यात देवदर्शन करुन आम्हाला गणपतीलाही जाऊन ते सगळं बघून फाईल काढायच्या आहेत आणि त्यात असे मेळावे कुठे – कुठे घ्यायचे आहेत आणि गर्दी होत नाही म्हणून तिथे अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांना गोळा करायचं असा उपरोधिक टोला लगावतानाच अरे हे काय चाललंय असा संतप्त सवालही त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय.
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य.
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका.
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’.
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?.
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक.
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका.
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा.
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं.