माझं ऐकायला शिका, माझ्याबरोबर फार पोलीस असतात, मध्ये बोलणाऱ्या दारुड्याला अजित पवारांचा सल्ला

बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली.

माझं ऐकायला शिका, माझ्याबरोबर फार पोलीस असतात, मध्ये बोलणाऱ्या दारुड्याला अजित पवारांचा सल्ला
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 20, 2020 | 7:25 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बिनधास्त शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली (Ajit Pawar suggestion to alcoholic supporter). त्यांचं भाषण सुरु असताना मध्येच एक दारुडा बोलायला लागला. या दारुड्याला अजित पवारांनी आता माझं ऐकायला शिका, माझ्याबरोबर फार पोलीस असतात, असं म्हणत मिश्किल सल्ला दिला. तसेच कळ काढा आणि शिक्का कप बशीवरच मारा, असंही सांगितलं.

अजित पवार यांनी निळकंठेश्वर पॅनलसाठी जाहीर प्रचार सभा घेतली. यावेळी ते म्हणाले, “तुम्ही कामांसाठी थेट प्लॅन आणि इस्टिमेट काढून या. उपमुख्यमंत्री झाल्यापासून मी नदी पात्र दुरुस्तीचं काम स्वतः जाऊन पाहतोय. कामासाठी निधी देईल मात्र स्थानिक पातळीवर कामाला विरोध नको. कामाच्या बाबतीत पाठपुरावा करण्यास तुम्ही कमी पडू नका. मी उपमुख्यमंत्री असेपर्यंत सर्वात जास्त विकास करणार आहे. असं केलं नाही, तर पवारांची औलद सांगणार नाही.”

राजकारणात अनेक चढ उतार असतात. मात्र, जनतेचं आमच्यावर प्रेम आहे. आता आपल्या विचाराचं सरकार आहे. मी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहे. अर्थ संकल्प सादर करताना सामान्य माणूस केंद्रस्थानी असणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेत 2 लाख रुपयांपर्यंत बसणाऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. पुढच्या टप्प्यात 2 लाख रुपयांवरील कर्ज असणाऱ्यांपैकी सातत्याने कर्ज फेडणाऱ्यांची कर्जमाफी करणार आहे, असंही आश्वासन अजित पवार यांनी दिलं.

‘अजित पवार खोटं बोलत नाही’

अजित पवार यांनी आपण खोटं बोलत नाही, असं सांगत मालेगाव कारखान्याच्या कारभारावर सडकून टीका केली. या कारखान्याची रिकव्हरी कमी असल्याचाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले, “मालेगाव कारखान्याच्या घाण पाण्याने नदीचं पाणी प्रदूषित होतंय. मी तक्रार केली तर कारखाना बंद होईल. त्यामुळं माझ्या विचाराचं पॅनल कारखान्यात आलं पाहिजे. आपण उच्च तंत्रज्ञान वापरुन सुधारणा करु. नदी पात्रातील घाण कायमची काढून टाकू. असं नाही झालं तर पुढच्या निवडणुकीत मला येऊ देऊ नका. या निवडणुकीत शरद पवार, सुप्रिया आणि माझ्याकडे पाहून मतदान करा.”

“गद्दरी केली तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे”

अजित पवार यांनी निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांनाही गद्दारी केल्यास याद राखा गाठ माझ्याशी आहे, असा इशारा दिला. अजित पवार म्हणाले, “मालेगाव कारखान्याचा अध्यक्ष सभासदांच्या प्रश्नांचं उत्तर देत नाही. त्यांनी कारखाना आणि शिक्षण संस्थेचं वाटोळं केलं. मी मंत्री मंडळात असून तुमचा सहावा गट निर्माण करणार आहे. बारा जागा भरायच्या असून तो निर्णय घेणार आहे. त्यासाठी पॅनल टू पॅनल मतदान करा. मला मतदान बूथनुसार केलेलं मतदान कळणार आहे. दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असं करणाऱ्यांची गंमत करेल. आता ऐकणार नाही. 30 वर्षे ऐकलंय. मी कुणालाही माफ करणार नाही. फोनचे रेकॉर्ड काढून चौकशी करणार आहे. माझा एनसीपी म्हणून मिरवणाऱ्यांनी गद्दारी केली तर याद राखा. गाठ माझ्याशी आहे.”

Ajit Pawar suggestion to alcoholic supporter

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें