औरंगाबाद हमारा था, हमारा है, हमारा रहेगा, अकबरुद्दीन ओवैसी यांचे संभाजीनगरात प्रतिपादन

इथे सर्वांच्या जातीचे आवाज आहेत, फक्त मुस्लिमांचे आवाज नाहीये. मी इथे आलोय की आपण जिवंत आहोत हे सांगायला आलो आहे. तुम्ही उठा एकत्र व्हा नाहीतर तुमची कौम धोक्यात आहे असेही अकबरुद्दीन ओवैसी यावेळी म्हणाले.

औरंगाबाद हमारा था, हमारा है, हमारा रहेगा, अकबरुद्दीन ओवैसी यांचे संभाजीनगरात  प्रतिपादन
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 1:47 PM

एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची संभाजीनगरात जाहीर प्रचारसभा झाली.या सभेत त्यांनी भाजपा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की मी दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रात तुम्हाला शेर बनविण्यासाठी आलो होतो. हा देश जेवढा तिलक लावणाऱ्यांचा आहे तेवढा दाढीवाल्यांचा आहे. दहा वर्षांपूर्वी मी तुम्हाला एकत्र करायचा प्रयत्न केला. तुम्हाला एकत्र करण्यासाठी मी शेरवाणाचा तुकडा पसरुन भीक मागितली होती. तुम्हाला शेर बनायचं असेल तर अत्याचाऱ्यांच्या विरोधात आवाज बुलंद करा.दहा वर्षांनंतर मी तुम्हाला आठवण करुन द्यायला आलो आहे. त्यावेळी कुणीही आमदार खासदार नव्हते, पण आमदार खासदार झाले, मी ते तुमच्या हातात दिले आणि त्यांनी महाराष्ट्रात ही ताकत पुढे नेली आहे. यश मिळाल्यास तुम्हाला खुर्ची देईन, मी तिथे खाली बसेन असेही अकबरुद्दीन ओवैसी यावेळी म्हणाले.

आज दोन एनसीपी आणि दोन सेना आहेत, पहा किती पार्ट्या झाल्या आहेत. शिवसेना आणि भाजप हिंदुत्व सांगणारे पक्ष आहेत, पण शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. उद्धव ठाकरे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले आहेत.उध्दव ठाकरे जी राहुल आणि प्रियांकाला हिंदुत्व शिकवण्यात यशस्वी झाले का ? वा राहुलआणि प्रियांकांना ठाकरेना शिकवण्यात यश आलं का ? अजित पवारांनी शिंदेचा आदर्श घेतला की शिंदेंनी अजित पवारांना आदर्श दिला की अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा आदर्श मोदी आणि योगींना दिला का ? असा सवाल यावेळी अकबरुद्दीन ओवैसी यांनी केला.

तुमची कृती देशाला कमजोर करत नाहीत का ?

एमआयएम मुस्लिम दलित मराठा समाजाची आवाज बनत आहे. मी कलमा पडणेवाला मुस्लिम आहे, पण मला हिंदुस्थानी असण्याचा अभिमान आहे.मी मुस्लिम आहे, मुस्लिमांच्या हक्काची लढाई लढत असतो. योगी म्हणतात बटोगे तो कटोगे, बीफच्या नावावर दाढी वाढवणाऱ्यांना तुम्ही कापत आहेत, ही तुमची कृती देशाला कमजोर करत नाहीत का ? हिंदू मुस्लिमांना लढवून देशाला तुम्ही कमजोर करत नाहीत का.? नरेंद्र मोदी हा हिंदुस्थान तुझा जेवढा आहे, तेवढा माझा पण आहे, हा देश कुणा एकाचा नाही असेही ओवैसी यावेळी म्हणाले. देशात बेरोजगारी, महागाई, बलात्कार हे खरे प्रश्न आहेत, पण त्यावर काहीच होत नाही देशात. फक्त धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट टाकण्याचे काम सुरु असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

जातीचं राजकारण करू नका असं तुम्ही सांगता, मग तुम्ही हे का सांगत नाहीत की धर्माचं राजकारण करू नका.मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, आम्ही कायम तुमच्यासोबत राहू.इथे दलित मुस्लिमांवर अत्याचार होत असतात, मराठा- दलित- मुस्लिम एकत्र येऊन अत्याचाऱ्याच्या विरोधात लढूया असे आवाहन यावेळी ओवैसी यांनी केले. मी जरांगे पाटलांना सांगू इच्छितो फक्त मराठा समाज मागास नाहीय तर संपूर्ण मराठवाडाच मागास आहे .मुंबई पुणे नागपूर पेक्षा मराठवाडा मागास आहे.मराठा अरक्षणासोबत मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्न करूया, 30 वर्ष झाले मराठवाडा विकास महामंडळ बनवले, पण ते कागदावर आहे, पैसाच दिलाच नाही, त्यामुळे अरक्षणासोबत मराठवाडा विकास महामंडलाला 50 हजार कोटी रुपयांची मागणी करूयात असेही ते यावेळी म्हणाले.

पाणी आणि नोकऱ्या हव्यात

औरंगाबाद संभाजीनगर नाव बदललं. पण नाव बदलल्यामुळे मराठवाड्यातील प्रश्न सुटणार आहेत का, अरे बेइमानानो काम करा काम.नीती आयोगाच्या अहवालात मराठवाडा सर्वात मागास असल्याचा अहवाल आला आहे.चला मराठ्यांचा साथ सोबत घेऊन मराठवाड्याच्या विकासासाठी लढूयात. मराठा मुख्यमंत्री, मंत्री नको..पण मराठवाड्यात पाणी आणि नौकऱ्या हव्या आहेत, मराठवाड्याला हक्क हवा आहे.शरद पवार ही हमी देणार का? की निवडणुकीनंतर मोदी सोबत जाणार नाहीत ?अजित पवार शिंदे उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर कशावरुन पलटी मारणार नाहीत ? असा सवाल अकबरुद्दीन ओवैसी यांनी केला.

औरंगाबाद हमारा था हमारा है हमारा रहेगा

आपल्याला भाजप, अजित पवार आणि शिंदे सेना यांना हरवायचं आहे.ज्या जातीकडे जोश आहे आणि होश नाही ती जात यशस्वी होत नाही. वेळ कठीण आहे, मला तुमची साथ हवी आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी कौमला कमजोर करू नका. आमच्या परवानगी शिवाय कुणीही सरकार बनवू शकणार नाही. योगी आणेवाला आहे तेरे बाद अकबर भी आणेवाला है, मोदी भी आणेवाला है तेरे बाद अकबर आयेगा…20 तारखेला आकाशात फक्त पतंग दिसेल. औरंगाबाद हमारा था हमारा है हमारा रहेगा असेही ओवैसी यांनी स्पष्ट केले.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.