AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आप’ सोडून काँग्रेसमध्ये घरवापसी, अल्का लांबांना प्रदेशाध्यक्षपदाचं गिफ्ट?

एके काळी 'आम आदमी पक्षा'च्या बड्या नेत्यांमध्ये गणना झालेल्या अल्का लांबा निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या.

'आप' सोडून काँग्रेसमध्ये घरवापसी, अल्का लांबांना प्रदेशाध्यक्षपदाचं गिफ्ट?
| Updated on: Feb 18, 2020 | 8:54 AM
Share

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसला खांदेपालट करावा लागणार आहे. ‘आप’मधून घरवापसी केलेल्या दिग्गज नेत्या अल्का लांबा यांच्याकडे दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा (Alka Lamba may become Delhi Congress President) सोपवली जाण्याची शक्यता आहे. सुभाष चोप्रा यांनी निकालाच्या दिवशीच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

एके काळी ‘आम आदमी पक्षा’च्या बड्या नेत्यांमध्ये गणना झालेल्या अल्का लांबा निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या. मतदानाच्या दोनच दिवसआधी ‘आप’ कार्यकर्त्याला कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केल्याने अल्का लांबा चर्चेत आल्या होत्या.

काँग्रेसच्या तिकीटावर चांदनी चौक मतदारसंघातून दिल्ली विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या अल्का लांबा यांना पराभवाचा धक्का बसला. ‘आम आदमी पक्षा’चे पर्लाद सिंह सावनी जवळपास तीस हजारांच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे सुमनकुमार गुप्ता आहेत.

चांदनी चौक मतदारसंघाच्याच माजी आमदार असलेल्या अल्का लांबा यांना केवळ 5 टक्के (3 हजार 881) मतं मिळवता आली. अल्का लांबा यांनी आमदारकीचा राजीनामा देत ‘आप’ला अलविदा करणं मतदारांना रुचलेलं दिसत नाही. त्यामुळे उमेदवार नाही, तर मतदारांनी पक्षाला मतदान केल्याचं चित्र आहे. तरीही अल्का लांबा यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्याचा आश्चर्यकारक निर्णय काँग्रेस घेण्याची चिन्हं (Alka Lamba may become Delhi Congress President) आहेत.

अल्का लांबा 2015 मध्ये ‘आप’च्या तिकिटावर चांदणी चौक मतदारसंघातून आमदारपदी निवडून आल्या होत्या. त्यांनी भाजपच्या सुमन कुमार गुप्तांचा 18 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. आम आदमी पक्षाला 62, तर भाजपला 8 जागा मिळाल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनी रविवारी रामलीला मैदानावर तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

केजरीवालांविरोधात बंड

‘आप’च्या नेतृत्वाविरुद्ध उघडपणे बंडखोरी केल्यावर ऑक्टोबर 2019 मध्ये लांबा काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी मागे घेण्याचा ठराव 2018 मध्ये दिल्ली विधानसभेत मांडला गेला होता. या ठरावाला विरोध दर्शवल्यानंतर लांबा आणि टीम केजरीवालमधील संबंध कटू झाले होते. 2014 मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी अलका लांबा यांनी जवळपास 20 वर्ष काँग्रेससोबत घालवली आहेत. (Alka Lamba may become Delhi Congress President)

सुभाष चोप्रांचा राजीनामा

मी पक्षाच्या कामगिरीची जबाबदारी घेतो, आम्ही यामागील कारणांचे विश्लेषण करु, अशी प्रतिक्रिया देत सुभाष चोप्रा यांनी दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ‘दिल्लीकरांनी साथ दिली, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊनही पराभव झाल्याने कारणांचं विचारमंथन करु. आमच्या मतदानाची टक्केवारी कमी होण्याचे कारण भाजप आणि आप या दोन्ही पक्षांनी केलेलं ध्रुवीकरणाचं राजकारण’ असा आरोपही चोप्रांनी केला होता.

Alka Lamba may become Delhi Congress President

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.