‘आप’ सोडून काँग्रेसला साथ, दिग्गज नेत्या अल्का लांबा पिछाडीवर

अल्का लांबा 2015 मध्ये 'आप'च्या तिकिटावर चांदणी चौक मतदारसंघातून आमदारपदी निवडून आल्या होत्या

'आप' सोडून काँग्रेसला साथ, दिग्गज नेत्या अल्का लांबा पिछाडीवर

नवी दिल्ली : सत्ताधारी ‘आम आदमी पक्षा’ची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्या अल्का लांबा पिछाडीवर आहेत. आपल्याच चांदनी चौक मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीत उतरलेल्या लांबा यांना पराभवाचा धक्का (Congress Alka Lamba Trailing) बसण्याची चिन्हं आहेत.

अल्का लांबा 2015 मध्ये ‘आप’च्या तिकिटावर चांदणी चौक मतदारसंघातून आमदारपदी निवडून आल्या. एके काळी ‘आम आदमी पक्षा’च्या बड्या नेत्यांमध्ये गणना झालेल्या अल्का लांबा निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या. दोनच दिवसांपूर्वी ‘आप’ कार्यकर्त्याला कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केल्याने अल्का लांबा चर्चेत आल्या होत्या.

भाजपने सुमन कुमार गुप्ता, तर ‘आप’ने पार्लादसिंग सावनी यांना चांदनी चौकातून उमेदवारी दिली आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत अल्का लांबा यांनी सुमन कुमार गुप्तांचा 18,००० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी तेही उत्सुक होते.

‘आप’च्या नेतृत्वाविरुद्ध उघडपणे बंडखोरी केल्यावर ऑक्टोबर 2019 मध्ये लांबा काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी मागे घेण्याचा ठराव 2018 मध्ये दिल्ली विधानसभेत मांडला गेला होता. या ठरावाला विरोध दर्शवल्यानंतर लांबा आणि टीम केजरीवालमधील संबंध कटू झाले होते. 2014 मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी अलका लांबा यांनी जवळपास 20 वर्ष काँग्रेससोबत घालवली आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे.

दिल्ली निकाल – आतापर्यंतचे कल
1) दिल्लीकरांची पुन्हा केजरीवालांना साथ, 56 जागांवर आघाडी
2) अरविंद केजरीवालांची हॅटट्रिक जवळपास निश्चित
3) दिल्लीवर तिसऱ्यांदा ‘आप’चा झेंडा
4) भाजपला 15 ते 20 दरम्यानच जागा मिळण्याची चिन्हं
5) काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ

Congress Alka Lamba Trailing

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI