एक अपवाद वगळता हरियाणातील सर्व मंत्र्यांचा पराभव

भाजपने मैदानात उतरवलेले स्टार खेळाडू पैलवान बबीता फोगाट आणि पैलवान योगश्वर दत्त यांचाही पराभव झाला. केवळ एका मंत्र्याने (Haryana Ministers defeat) स्वतःची जागा वाचवली आहे.

एक अपवाद वगळता हरियाणातील सर्व मंत्र्यांचा पराभव
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 8:36 PM

चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी अत्यंत धक्कादायक असा निकाल समोर आला. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही अजून बहुमतापासून मात्र दूर आहे. भाजपच्या अनेक दिग्गजांचा पराभव (Haryana Ministers defeat) झाला, ज्यात एक अपवाद वगळता सर्व मंत्र्यांनाही विरोधी उमेदवारांनी धूळ चारली. विशेष म्हणजे भाजपने मैदानात उतरवलेले स्टार खेळाडू पैलवान बबीता फोगाट आणि पैलवान योगश्वर दत्त यांचाही पराभव झाला. केवळ एका मंत्र्याने (Haryana Ministers defeat) स्वतःची जागा वाचवली आहे.

भाजपचे हरियाणा प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनाही जागा वाचवता आली नाही. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी करनाल मतदारसंघातून विजय मिळवला. भाजपने यावेळी दोन कॅबिनेट मंत्र्यांचं तिकीट कापलं होतं. हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनाच केवळ विजय मिळवता आला.

नारनौंद

नारनौंद मतदारसंघातून खट्टर सरकारमधील अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. जननायक जनता पार्टीचे रामकुमार गौतम यांनी त्यांच्यावर 12029 मतांच्या फरकाने मात केली.

बादली

कॅबिनेट मंत्री राहिलेले ओम प्रकाश धनकड यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. बादली मतदारसंघातून काँग्रेसचे कुलदीप वत्स यांनी त्यांच्यावर 11245 मतांनी मात केली.

महेंद्रगड

भाजपचे दिग्गज नेते आणि शिक्षण मंत्री राहिलेले राम विलास शर्मा यांचाही पराभव झाला. महेंद्रगडमधून काँग्रेसचे राव दान यांनी 10 हजारपेक्षा जास्त मतांच्या फरकाने त्यांच्यावर मात केली.

सोनीपत

खट्टर सरकारमधील एकमेव महिला मंत्री कविता जैन यांनाही त्यांची जागा वाचवता आली नाही. सोनीपत मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेंद्र पवार यांनी 32878 मतांनी विजय मिळवला.

इसराना

खट्टर सरकारमधील परिवहन मंत्री कृष्ण लाल पवार यांनाही जागा वाचवता आली नाही. इसराना मतदारसंघातून काँग्रेसच्या बलबीर सिंह यांनी कृष्ण लाल पवार यांच्यावर 20015 मतांनी मात केली.

रोहतक

खट्टर सरकारमधील मंत्री मनीष ग्रोवर यांनाही रोहतकमधून पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे भारत भूषण बत्रा यांनी 2735 मतांनी विजय मिळवला.

रादौर

मंत्री राहिलेले करन देव कंबोज यांचाही रादौरमधून पराभव झालाय. काँग्रेसचे बिशन लाल यांनी त्यांच्यावर 2541 मतांनी मात केली.

प्रदेशाध्यक्षाचाही पराभव

हरियाणातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनाही स्वतःची जागा वाचवता आली नाही. तोहाना मतदारसंघात त्यांच्यावर जननायक जनता पार्टीचे देवेंद्र सिंह बबली यांनी तब्बल 52302 मतांच्या फरकाने मात केली.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.