BJP : बारामतीमध्ये पवारांना रोखण्यासाठी सर्वकश प्रयत्न, शेवटी पवारांच्या बालेकिल्ल्यातील परिवर्तनावर काय म्हणाले बावनकुळे?

राज्यातील 16 मतदार संघात 9 केंद्रीय मंत्री हे दाखल झाले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि व्यापारी, वकील यांच्याशी संवाद साधण्याचे काम केंद्रीय मंत्री हे करीत आहेत.

BJP : बारामतीमध्ये पवारांना रोखण्यासाठी सर्वकश प्रयत्न, शेवटी पवारांच्या बालेकिल्ल्यातील परिवर्तनावर काय म्हणाले बावनकुळे?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 3:04 PM

कुणाल जायकर प्रतिनीधी : अहमदनगर : एकीकडे राज्याचे राजकारण विविध मुद्द्यांवरुन ढवळून निघत असताना दुसरीकडे भाजप पक्ष (BJP Party) मात्र, पक्ष संघटनेवर कायम भर देत आहे. लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने सर्वतोपरी तयारी सुरु झाली आहे. केंद्रीय मंत्री हे राज्यात दाखल झाले आहेत. बारामती मतदार संघात अर्थमंत्री निर्मला सितारमण ह्या असून या मतदार संघात घडी बंद करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत. तर आमचा प्रयत्न असला तरी सर्वकाही हे जनतेच्या हातामध्ये असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे बारामतीकरांचा कौल कुणाला हे वेगळे सांगण्याची आवश्यकताच राहिलेली नाही.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अहमनगर दौऱ्यावर असून त्यांनी शिंगणापूर येथील शनीचे दर्शन घेतले. तर आरती करुन विकास कामात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असावा तर राज्यातील जनता निरोगी रहावी असे साकडे घातले.

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात भाजपाने तयारी सुरु केली आहे. निवडणुकांना अवधी असला तरी, पक्ष संघटन आणि विस्तार यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय प्रदेशाध्यक्ष पदी बावनकुळेंची वर्णी लागल्यापासून संघटनेच्या विस्तारासाठी अधिकचे प्रयत्न केले जात आहेत.

राज्यातील 16 मतदार संघात 9 केंद्रीय मंत्री हे दाखल झाले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि व्यापारी, वकील यांच्याशी संवाद साधण्याचे काम केंद्रीय मंत्री हे करीत आहेत. बारामती मतदार संघात अर्थमंत्री निर्मला सितारमण ह्या दाखल झाल्या होत्या.

बारामती मतदार संघामध्ये घडी बंद पाडण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत. तर दुसरीकडे जनता काय निर्णय देते हे देखील तेवढेच महत्वाचे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे जनतेचा निर्णय आम्हाला मान्यही असेल असेही ते म्हणाले आहेत.

कॉंग्रेसच्या माध्यमातून देशभर भारत जोडो यात्रा काढली जात आहे. राहुल गांधी हे यात्रेचे नेतृत्व करीत आहेत. तर यात्रेला सर्वसामान्यांचा प्रतिसाद नाही. शिवाय यात्रेत सहभागी असलेले सर्वजण हे कार्यकर्तेच असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यात्रा ही फुसका बार असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीमध्ये नुकताच प्रवेश केलेले एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे अमित शाह यांना केलेल्या फोनवर हे एकनाथ खडसे हेच अधिक स्पष्ट सांगून शकतील असे म्हणून बावनकुळे यांनी उत्तर देण्यास टाळले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.