AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाल उधळत नाचायला आदित्य ठाकरेंचं लग्न ठरलंय का?; नितेश राणेंची खोचक टीका

या पुढे जर कुणी आमच्या महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले तर ते काय परत घरी सुखरूप घरी जाणार नाहीत. गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. कारण आम्हाला आमचा देश आणि राज्य वाचवायचं आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

गुलाल उधळत नाचायला आदित्य ठाकरेंचं लग्न ठरलंय का?; नितेश राणेंची खोचक टीका
गुलाल उधळत नाचायला आदित्य ठाकरेंचं लग्न ठरलंय का?; नितेश राणेंची खोचक टीकाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2022 | 2:17 PM
Share

समीर भिसे, मुंबई: शिवसेनेला (shivsena) दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवन आणि मातोश्री निवासस्थानाबाहेर प्रचंड जल्लोष केला. यावेळी शिवसैनिकांनी गुलाल उधळत ढोलाच्या तालावर ठेका धरत आपला आनंद व्यक्त केला. शिवसैनिकांच्या या जल्लोषावर भाजप (bjp) आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. गुलाल उधळत एवढं नाचायला आदित्य ठाकरेंचं लग्न ठरलं आहे का? भाजपला दहीहंडीच्यावेळी जांबोरी मैदान मिळालं. मग भाजपनेही असंच नाचायला हवं होतं का? असा सवाल करत नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भांडायला लागते हे त्यांचं अपयश नाही का? एक साधं मैदान तर जिंकलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदरच करावा लागतो. त्यांना योग्य वाटलं तसा त्यांनी निर्णय दिला. पण आदित्यचं काय एखाद्या मुलीशी लग्न ठरलं आहे का? मग एवढं गुलाल उधळत नाचायची गरज काय? आम्ही दहीहंडीच्यावेळी जांबोरी मैदान मिळवलं. तेव्हा भाजपने नाचून दाखवायचं होतं का? साधं एक मैदान मिळालं तर एवढं नाचतायहेत. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नावेळी तर हे सी-लिंकमध्ये उड्याच मारतील, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

यावेळी त्यांनी शीतल म्हात्रे प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. श्रीकांत शिे यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे. म्हात्रेही त्यांची भूमिका स्वत: मांडतील, असं सांगत या मुद्द्यावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं.

पीएफवाय ही एक दहशतवादी संघटना आहे. देशाच्या विरोधात ते सातत्याने कारवाई करत आहेत. मुस्लिम तरुणांचा वापर सुरू आहे. या तरुणांना हाताशी धरुन त्यांना आधार कार्ड बनवून दिलं जात आहे. धर्मांतरासाठी ही संघटना काम करते. हिंदू समाजाला नुकसान पोहोचवण्यासाठी ते काम करत आहेत, असं ते म्हणाले.

या तरुणांनी पुण्यात पाकिस्तानच्या समर्थनाचे नारे लावण्याची हिंमत दाखवली. याचा अर्थ ही पाळंमुळं किती खोल गेली आहे हे दिसून येतं. त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी. त्यांना अटक करून त्यांची हिंमत तोडण्याचं काम पोलिसांनी केलं पाहिजे. आज राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. हिंदुत्वावादी गृहमंत्री आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करावी. भविष्यात त्यांच्या तोडून पाकिस्तानचं नाव ही येता कामा नये, असं त्यांनी सांगितलं.

या पुढे जर कुणी आमच्या महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले तर ते काय परत घरी सुखरूप घरी जाणार नाहीत. गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. कारण आम्हाला आमचा देश आणि राज्य वाचवायचं आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.