AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon vs MNS | मनसे कार्यकर्त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

मनसेच्या कार्यकर्त्यांनी 25 डिसेंबरला अॅमेझॉनच्या कार्यालयावर तोडफोड केली होती. त्याबाबत अंधेरी कोर्टानं मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Amazon vs MNS | मनसे कार्यकर्त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी
| Updated on: Dec 29, 2020 | 2:16 PM
Share

मुंबई: मराठी भाषेचा वापर करण्यासाठी मनसेनं अॅमेझॉनविरोधात मोहीम उघडली आहे. या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांना काहीसा धक्का बसलाय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी 25 डिसेंबरला अॅमेझॉनच्या कार्यालयावर तोडफोड केली होती. त्याबाबत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपींना अंधेरी कोर्टात हजर केलं. तेव्हा अंधेरी कोर्टानं मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (MNS dispute against Amazon, 1 day police custody for MNS activists)

अॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयात खेचल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या चांदिवली परिसरात असणाऱ्या अॅमेझॉनच्या गोदामाला मनसैनिकांनी लक्ष केलं होतं. अॅमेझॉनच्या वकिलांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर संतप्त मनसैनिकांनी चांदीवलीतील साकीविहार मधल्या मारवे रोडवरील अॅमेझॉनच्या कार्यालयात जात तोडफोड केली.

यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांंनी औरंगाबाद आणि पुण्याच्या कोंढवा येथील अमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतर आता मुंबईतही असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे आता हे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे Amazon vs MNS हा वाद आणखीनच चिघळला आहे.

राज ठाकरेंना नोटीस

मराठी भाषेवरुन सुरु केलेल्या मोहिमेवरुन अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर पाच जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत. “अ‍ॅमेझॉनसारख्या प्रतिष्ठित कंपनीने एका चांगल्या लीगल फर्मला अपॉईंट करणं अपेक्षित होतं. पण एखाद्या मूर्ख वकिलाकडून त्यांनी ते लेटर ड्राफ्ट केलं आहे. त्यांनी जी नोटीस पाठवली आहे, त्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची किंमत नक्कीच ॲमेझॉनला येत्या काळात मोजावी लागेल, असा इशारा मनसेच्या अखिल चित्रे यांनी दिला होता.

मुंबईत अ‌ॅमेझॉनविरोधात फलक

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत अ‍ॅमेझॉनविरोधात (Amazon) फलक लावण्यात आले होते. यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळाले होते.

संबंधित बातम्या:

Amazon vs MNS | राज ठाकरेंना नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Amazon vs MNS | ॲमेझॉनला किंमत मोजावी लागेल, राज ठाकरेंना नोटिशीनंतर मनसे आक्रमक

MNS dispute against Amazon, 1 day police custody for MNS activists

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.