AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ARMC election 2022 : अमरावती महापालितल्या नव्यानं झालेल्या प्रभाग 23मध्ये कोण मारणार बाजी? जाणून घ्या सविस्तर…

87 जागांच्या महापालिकेत मागील वेळी 45 जागा घेत भाजपा प्रथम क्रमांकावर होती. त्याखालोखाल काँग्रेसचे 16 ठिकाणी नगरसेवक निवडून आले. एमआयएम 10 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर असून शिवसेना 7 जागांसह चौथ्या स्थानी असल्याचे पाहायला मिळाले होते.

ARMC election 2022 : अमरावती महापालितल्या नव्यानं झालेल्या प्रभाग 23मध्ये कोण मारणार बाजी? जाणून घ्या सविस्तर...
अमरावती महापालिका, वॉर्ड 23Image Credit source: tv9
| Updated on: Jul 24, 2022 | 7:30 AM
Share

अमरावती : राज्यात तर नवे सरकार आले. ते किती दिवस टिकेल, हे येणारा काळच ठरवेल. दुसरीकडे राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अमरावती महानगरपालिकेतदेखील निवडणुकीची (ARMC election 2022) लगबग आहे. भाजपाच्या ताब्यात असलेली अमरावती महानगरपालिका यावेळी कुणाच्या हाती जाणार, याची सर्वांनाच उत्सुकत आहे. 87 जागांच्या महापालिकेत 45 नगरसेवक भाजपाचे (BJP) होते. त्याखालोखाल काँग्रेस आणि नंतर एआयएमआयएम (AIMIM) असे पक्षीय बलाबल पाहायला मिळाले होते. राज्यात मागील अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. मात्र आता शिवसेना आमदार फुटून भाजपासोबत गेले आहेत. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही दिसून येणार आहे. या गणिताचा फायदा फाजपाला होईल, की काँग्रेस, एमआयएम आणि इतर पक्ष काही वेगळे राजकारण करतात, यावर विजय अवलंबून असणार आहे. यंदा 98 जागांसाठी निवडणूक होणार आहे. एकूण 11 जागा वाढल्या आहेत. प्रभाग 23मधील काय स्थिती आहे, याचा हा आढावा…

प्रभागातील व्याप्ती कशी?

महाजनपुरा, आनंद नगर, औरंगपुरा, अंबागेट परिसर, महाजनपुरी गेट, पटवीपुरा, जुनी टाकसाळ, कुंभारवाडा, बुधवार परिसर अशी व्याप्ती आहे. तर एकवीरा अंबादेवी संस्थान, बुधवार चौक, साबनपुरा, अंबादेवी नाला, भातकुली रोड, गांधी आश्रम असे महत्त्वाचे परिसर आहेत.

लोकसंख्येचे गणित

अमरावती प्रभाग 23मधील एकूण लोकसंख्या 18,689 इतकी आहे. यात अनुसूचित जातीच्या समाजाची संख्या 4637 तर अनुसूचित जमातीच्या समाजाची संख्या 572 इतकी आहे. 2021ला जनगणना झालेली नाही. त्यामुळे आधीच्याच लोकसंख्येत काही टक्के गृहीत धरण्यात आली आहे.

प्रभाग 23 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजपा
काँग्रेस
एमआयएम
शिवसेना
इतर

प्रभाग 23 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजपा
काँग्रेस
एमआयएम
शिवसेना
इतर

प्रभाग 23 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजपा
काँग्रेस
एमआयएम
शिवसेना
इतर

कोण मारणार  बाजी?

87 जागांच्या महापालिकेत मागील वेळी 45 जागा घेत भाजपा प्रथम क्रमांकावर होती. त्याखालोखाल काँग्रेसचे 16 ठिकाणी नगरसेवक निवडून आले. एमआयएम 10 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर असून शिवसेना 7 जागांसह चौथ्या स्थानी असल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी 98 जागांसाठी निवडणूक होणार आहे. एकूण 11 जागा वाढल्या आहेत. त्यामुळे नव्याने उमेदवार असणार आहेत.

आरक्षण कसे?

प्रभाग क्रमांक 23च्या प्रवर्ग अ हा अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. 8 ब हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी तर क हा प्रवर्ग सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. . मागील वेळी चार सदस्यांचा प्रभाग होता. यावेळी तो तीन सदस्यीय करण्यात आला आहे. त्यामुळे आरक्षणही बदलले आहे.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.