राज्यातील दंगलींच्या चौकशीसाठी ठाण्यात भाजपची निदर्शनं, निरंजन डावखरेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती शहरात अद्यापही काही सवलतीसह संचारबंदी आदेश लागू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून आज राज्यातील दंगलींच्या चौकशीसाठी निदर्शनं करण्यात येत आहेत. ठाण्यातही आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात निदर्शनं करण्यात आली. तसंच जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीसाठी निवेदन देण्यात आलं आहे.

राज्यातील दंगलींच्या चौकशीसाठी ठाण्यात भाजपची निदर्शनं, निरंजन डावखरेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
निरंजन डावखरे, अमरावती हिंसाचार
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 2:21 PM

ठाणे : त्रिपुरातील कथित घटनेनंतर राज्यात अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. अमरावती शहरात अद्यापही काही सवलतीसह संचारबंदी आदेश लागू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून आज राज्यातील दंगलींच्या चौकशीसाठी निदर्शनं करण्यात येत आहेत. ठाण्यातही आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात निदर्शनं करण्यात आली. तसंच जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीसाठी निवेदन देण्यात आलं आहे. (Demonstration led by MLA Niranjan Davkhare in Thane to investigate riots)

राज्यात मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे झालेल्या दंगलींची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करावी. या मागणीबरोबरच दंगलीच्या निषेधार्थ ठाणे शहर भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले.

‘स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरही हल्ले’

राज्यात नुकत्याच झालेल्या दंगलीत 15 हजार ते 40 हजार लोकांच्या जमावाने रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला. या प्रकाराचा भाजप निषेध करीत आहे. जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावतीत लोक रस्त्यावर उतरले. ते कोण्या एका पक्षाचे नव्हते वा कोणी त्यांचे नेतृत्व करत नव्हते. मात्र, स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरही हल्ले केले गेले. त्यानंतर पोलिस यंत्रणेकडून पक्षपाती पद्धतीने कारवाई केली जात आहे. अफवा पसरवून दंगल करणाऱ्यांना पाठीशी घालून स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांना मात्र पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

‘भाजपचे नेते, कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी’

त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत करावी. दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक करावी, दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी, स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी, भाजपचे नेते व कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली असून, काहीही ठोस कार्य केलेले नाही. केवळ मतांचे राजकारण करण्याचे पाप केले जात आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दंगलीचे कृत्य करण्यात आले आहे, असा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी केला आहे.

इतर बातम्या :

Video : अभिनंदन वर्धमान यांचा ‘वीर चक्र’ पुरस्काराने सन्मान, राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं, चंद्रकांतदादांना विश्वास; अमल महाडिकांच्या विजयाचाही दावा

Demonstration led by MLA Niranjan Davkhare in Thane to investigate riots

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.