बाळासाहेबांचं खरं स्वप्न जमिनीवर येऊन पूर्ण करा : अमृता फडणवीस

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खरं स्वप्न आता जमिनीवर येऊन पूर्ण करा," असे टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला (Amruta Fadnavis tweet) आहे.

बाळासाहेबांचं खरं स्वप्न जमिनीवर येऊन पूर्ण करा : अमृता फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 06, 2020 | 5:18 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत (Amruta Fadnavis tweet) आहे. हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर औरंगाबादमध्ये बिअर बार चालकाने घरात घुसून महिलेला जिवंत जाळले. यात पीडित महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांनी सध्या महाराष्ट्र हादरला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खरं स्वप्न आता जमिनीवर येऊन पूर्ण करा,” असे टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

“महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यात 4 अॅसिड अटॅकच्या दुदैवी घटना घडल्या आहे. नागपूरमध्ये हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न आणि औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण या दोन्ही घटना ऐकून त्रास होतो. आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक,” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

“देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ या ‘acid attack victors’ साठी असलेल्या योजनेतील सवलती हिंगणघाट पीडितेला देण्यात याव्या. तसेच महिला आयोग अध्यक्षाचे पद लवकर भरण्यात यावे. माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जामिनीवर येऊन पूर्ण करा,” असा टोलाही अमृता फडणवीसांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी असे आदेश त्यांनी गृहविभागास दिले (Amruta Fadnavis tweet) आहेत.

महिला व बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून यात हयगय करणाऱ्यांना माफी नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. पोलीस यंत्रणेतील कोणतीही व्यक्ती, मग ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी जे या कामात टाळाटाळ करतील किंवा विलंब लावतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

गुन्हासिद्धतेसाठी विशेष प्रयत्न

महिला अत्याचारांच्या घटनेत न्यायालयात प्रकरणे दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल लागण्यास खुप विलंब लागतो. यात न्यायासाठी झगडणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास डळमळायला लागतो, असे होऊ नये. गुन्हेगारांवर वेळीच कारवाई होऊन त्यांच्यावर जरब बसावा यासाठी महिला अत्याचाराच्या केसेस लवकरात लवकर निकाली लागतील यादृष्टीने राज्य शासन फास्ट ट्रॅक कोर्ट, विशेष न्यायालयांची स्थापना यासारख्या गोष्टीं प्राधान्याने हाती घेणार आहे. राज्य महिला आयोगाचे सक्षमीकरण हा ही त्यातील एक महत्वाचा विषय असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी (Amruta Fadnavis tweet) सांगितले.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.