AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anand Shinde | विधानपरिषदेत ‘शिंदेशाही बाणा’, राष्ट्रवादीकडून आनंद शिंदेंचं तिकीट जवळपास कन्फर्म

राष्ट्रवादीकडून बुलंद आवाजाचे बादशाह सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचं नाव विधानपरिषदेसाठी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.

Anand Shinde | विधानपरिषदेत 'शिंदेशाही बाणा', राष्ट्रवादीकडून आनंद शिंदेंचं तिकीट जवळपास कन्फर्म
| Updated on: Nov 06, 2020 | 7:06 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीकडून बुलंद आवाजाचे बादशाह सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचं नाव विधानपरिषदेसाठी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विधीमंडळातही आता ‘खणखणीत’ शिंदेशाही आवाज घुमणार आहे. (Anand Shinde NCP Candidate For MLC)

गायक आनंद शिंदे यांचं आंबेडकरी चळवळीत मोठं योगदान आहे. आपल्या गीत-गायनाच्या आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरी चळवळ वाड्या-वस्त्यांवर पोहचवली. गेल्या अनेक दिवसांपासून ते राष्ट्रवादीच्या सार्वजनिक मंचावरुन दिसून आले. आज अखेर राष्ट्रवादीने त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावलेली आहे.

आनंद शिंदे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचे याआधीही बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आनंद शिंदेंची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर लांबलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद निवडणुकीतून शिंदे राजकीय आखाड्यात उतरण्याचे संकेत मिळत आहेत.

खरं तर, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतच आनंद शिंदे रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. आनंद शिंदे यांना महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ किंवा माळशिरस या राखीव मतदारसंघातून आनंद शिंदे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु यथावकाश या चर्चा विरल्या.

आनंद शिंदे यांचा परिचय

आनंद शिंदे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे आहेत. त्यांच्या खणखणीत आवाजात अनेक गाणी गाजली आहेत. कोंबडी पळाली, शिट्टी वाजली, जवा नवीन पोपट हा.. यासारखी हिट गाणी आनंद शिंदे यांनी दिली आहेत. भारदस्त आवाजाचा गायक म्हणून ते ओळखले जातात. वडील प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आनंद शिंदे चालवत आहेत. मुलगा आदर्श आणि उत्कर्ष शिंदेही शिंदेशाहीची पताका डौलाने फडकवत आहेत.

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर आज अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज संध्याकाळी 6च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब आणि अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली. त्यानंतर या तिघांनीही राज्यपालांशी काहीवेळ चर्चा केली. मात्र, राज्यपालांना देण्यात आलेल्या नावांचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. आता ही यादी राज्यपालांकडे आल्यानंतर राज्यपाल त्यावर कधीपर्यंत निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Anand Shinde NCP Candidate For MLC)

संबंधित बातम्या

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार जवळपास निश्चित; राजू शेट्टींना दिलेलं वचनही पाळणार

नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित, माजी आमदाराचा दावा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.