औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या मागे सध्या ईडीचे शुक्लकाष्ट लागले आहे. कारण, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे चिरंजीव अभिजीत अडसूळ यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. काही तास चौकशी केल्यानंतर ईडीने आनंदराव अडसूळ यांना ताब्यात घेतलं, त्यावेळी त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना गोरेगावच्या लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या कारवाईवरुन काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी या कारवाया सुरु असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. (Vijay Vadettiwar criticizes BJP over ED action against Anandrao Adsul)