“पोरं निकम्मी असतात तेव्हा म्हाताऱ्या बापाला फिरावं लागतं”, पवारांच्या दौऱ्यांवरुन भाजपचं टीकास्त्र

भारतीय जनता पार्टीच्या किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी बुलडाणा येथील शेगावमध्ये राज्य सरकार, काँग्रेस वर जोरदार टीकास्त्र सोडले.(Anil Bonde criticise state government on Sharad Pawar visits to rainfall affected area)

पोरं निकम्मी असतात तेव्हा म्हाताऱ्या बापाला फिरावं लागतं, पवारांच्या दौऱ्यांवरुन भाजपचं टीकास्त्र
Yuvraj Jadhav

| Edited By: सचिन पाटील

Oct 29, 2020 | 2:48 PM

बुलडाणा : भारतीय जनता पार्टीच्या किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी बुलडाणा येथील शेगावमध्ये राज्य सरकार, काँग्रेस वर जोरदार टीकास्त्र सोडले.  “अतिवृष्टी, कांदा प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दौरे करत आहेत. पवार साहेबांबद्दल कौतुक असले तरी पण म्हाताऱ्या बापाला का फिरावं लागतं?, जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं, शरद पवारांच्या दौऱ्यांमुळे हे सरकार लायकीचे नसल्याचे स्पष्ट होते”, अशी टीका माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली. (Anil Bonde criticise state government on Sharad Pawar visits to rainfall affected area)

कपटीपणा करुन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आले आहेत, त्यांनी सरकार चालवून दाखवावे, असं आव्हान बोंडे यांनी दिले आहे. राज्याच्या सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे, हे भाजपा ने कधीच म्हटले नाही. मात्र, कपटीपणाने सत्तेवर आला आहात तर सरकार चालवून दाखवा. जनतेची कामे करा, जे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते ते पूर्ण करा, असं आव्हान अनिल बोंडे यांनी राज्य सरकारला दिले.

अनिल बोंडे यांनी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविषयी काँग्रेस शेतकऱ्यांमध्ये अप्रचार करतय असा आरोप केला. कृषी विधेयकाविषयी भाजपकडून सुरु असलेल्या जनजागृती मोहीमेसाठी बोंडे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. काँग्रेसने कृषी कायंद्याविरोधात आंदोलन करताना ट्रॅक्टर जाळला. मात्र, आम्ही ट्रॅक्टरचे पूजन करत आहोत. शेतकऱ्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींने अभिनंदन आणि धन्यवाद देणारी पत्रं पाठवत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील कृषी कायद्यावंरिल स्थगिती उठवावी, अशी विनंती करतोय, असं अनिल बोंडे म्हणाले.

बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला होता. जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकाने पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदत करावी. मूग, उडीद आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याचे बोंडे म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही राज्य सरकारवर टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचं कंत्राट घ्या, असं उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितलं असेल. तसा त्यांच्यात करार झाला असेल, अशी बोचरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

शरद पवारच राज्य चालवत आहेत, बाहेर पडतात, पण…; चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, राज ठाकरेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

(Anil Bonde criticise state government on Sharad Pawar visits to rainfall affected area)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें