AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना आणि अनिल गोटे मिळून धुळ्यात भाजपला रोखणार?

धुळे : भाजपला पक्षांतर्गत वाद धुळे महापालिका निवडणुकीत महागात पडण्याची शक्यता आहे. 7 तारखेला प्रचार संपणार असून आता लढत मात्र भाजप विरुद्ध आमदार अनिल गोटे यांचा लोकसंग्राम अशी आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली असली, तरी पाहिजे तसा राष्ट्रवादीचा प्रभाव शहरात दिसून येत नाही. राष्ट्रवादीमधून अनेक नगरसेवक भाजपात गेल्याने राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता […]

शिवसेना आणि अनिल गोटे मिळून धुळ्यात भाजपला रोखणार?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM
Share

धुळे : भाजपला पक्षांतर्गत वाद धुळे महापालिका निवडणुकीत महागात पडण्याची शक्यता आहे. 7 तारखेला प्रचार संपणार असून आता लढत मात्र भाजप विरुद्ध आमदार अनिल गोटे यांचा लोकसंग्राम अशी आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली असली, तरी पाहिजे तसा राष्ट्रवादीचा प्रभाव शहरात दिसून येत नाही. राष्ट्रवादीमधून अनेक नगरसेवक भाजपात गेल्याने राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. पण भाजपसाठी डोकेदुखी म्हणजे शिवसेना आणि अनिल गोटे हे आहेत. या निवडणुकीसाठी सगळे पक्ष मैदानात उतरले असताना भाजपात मात्र दोन गट पडले आहेत. खासदार डॉ. सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यातला वाद हा उघड असून निवडणुकीसाठी दोघांनीही वेगळी तयारी सुरु केली आहे. यावर भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या शहरात मंत्री गिरीश महाजन, डॉ. सुभाष भामरे हे तळ ठोकून आहेत. भाजपात गुंडांना प्रवेश दिल्याने गोटे यांनी आपली लोकसंग्रामच्या माध्यमातून वेगळी चूल मांडली आहे. अंतर्गत वाद भाजपची डोकेदुखी येत्या 9 डिसेंबरला धुळे महापालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सगळे राजकीय पक्ष कसून तयारीला लागले आहेत. जळगाव महापालिका निवडणुकीच्या यशानंतर भाजपला धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. या निवडणुकीची जबाबदारी भाजपने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली आहे. मात्र, गिरीश महाजन यांच्या नियुक्तीवर आमदार अनिल गोटे नाराज झाले असून त्यांनी स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेऊन तिकीट वाटप करण्यास सुरुवात केली. धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यातला वाद हा नवीन राहिलेला नाही. त्यातच या निवडणुकीसाठी डॉ. सुभाष भामरे यांनीही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजपात डॉ. भामरे आणि आमदार गोटे यांच्यात दोन गट पडले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपच्या मंत्र्यांवर मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. भारिप आणि एमआयएम हे पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. अनिल गोटेंची वेगळी चूल आमदार अनिल गोटे यांनी स्वच्छ आणि कोरी पाटी असणाऱ्या तरुण उमेदवारांना संधी देण्याचे ठरवलंय. मात्र दुसरीकडे डॉ. सुभाष भामरे हे राष्ट्रवादीसह अन्य पक्षातल्या आणि महत्त्वाची पदं घेऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या लोकांना भाजपात प्रवेश देत आहेत. त्यातल्या अनेक लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत. आमदार अनिल गोटे हे भाजपात तरुण उमेदवारांना संधी देऊ इच्छित असताना दुसरीकडे भामरे हे आयारामांना संधी देत असल्याचं पाहायला मिळतंय. आमदार अनिल गोटे यांनी याबाबत वेळोवेळी पत्रक काढून भामरे यांच्यावर टीका देखील केली आहे. धुळे शहरात काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेव दानवे, जसलसंपदा मंत्री गिरीश महाजन, डॉ. सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांची सभा होती. या सभेत भाषण सुरु असताना जो प्रकार झाला, तो महाराष्ट्राने पाहिलाच होता. आमदार गोटे यांना डावल्याचा आरोप करत कार्यकर्ते एकमेकात भिडले. गोंधळ वाढताच पोलिसांनी मध्यस्थी केली आणि वाद मिटवला. या दोन गटांमुळे इतर पक्षांना फायदा होईल का, याकडे नजरा लागल्या आहेत. या नंतर गोटे यांनी शहरात सभा घेऊन महापालिकेच्या महापौरपदाचा उमेदवार म्हणून स्वतः असणार असल्याचं जाहीर केले. सध्या पक्षात असून मी फक्त आमदारकीचा राजीनामा देत आहे, असं जाहीर केलं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर आमदार गोटे यांनी आपला राजीनामा मागे घेतला. पण मुख्यमंत्र्यांनी शब्द न पाळल्याचा आरोप करत गोटेंनी पुन्हा वेगळी चूल मांडली. जाहीर पत्र लिहून भाजपवर नाराजी धुळे शहर भाजप आमदार अनिल गोटे यांनी पत्रक काढून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पक्षातील कुरघोडीचं राजकारण गोटे यांना आवडत नाही. “सध्या महापालिका निवडणुकी संदर्भात सुभाष भामरे गटाकडून पक्षात मतांसाठी गुंडांना खुलेआम प्रवेश दिला जात आहे. मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असूनही मला दानवेंच्या सभेत डावलल्यामुळे अपमानास्पद वागणूक दिली गेली. विधान परिषदेची निवडणूक असताना मी मतदान केलं त्या वेळी विनोद तावडे यांनी मला पैशांची ऑफर दिली. तुमचे पैसे कुठे पाठवू असे फोनवर तावडे यांनी सांगितलं. त्यांना मी त्यावेळी ठणकावून सांगितलं होतं की मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी आमदारकीचा राजीनामा देत आहे, पक्षाचा नाही. कारण, पक्ष कुणाच्या बापाचा नाही”, असं गोटे यांनी म्हटलं होतं. “मला तेलगी प्रकरणात गुंतवून तब्बल चार वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. मला कोणत्याही वकिलाशिवाय जामीन मिळाला. या नंतर मी आमदार म्हणून निवडून आलो. एकीकडे भाजप भयमुक्त आणि गुंडगिरीमुक्त भाजप निर्माण करत आहे आणि धुळ्यात मात्र गुंडशाहीला प्राधान्य देत आहेत,” असा आरोप आमदार गोटे यांनी केला आहे. अनिल गोटे आणि शिवसेनेचं साटंलोटं एकंदरीत काय तर आता आमदार गोटे यांनी भाजपची पोलखोल सुरु केली आहे. त्यामुळे आमदार गोटे यांचा राजीनामा आता भाजपला डोकेदुखी ठरणार आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपानंतर मतदारांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे. महापालिका निवडणुकीत मंगळवारी शिवसेनेने आमदार गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाच्या 13 सक्रिय उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. याआधी आमदार गोटे यांनी शिवसेनेच्या पाच उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्याची एकप्रकारे परतफेडच शिवसेनेने केली. भाजपचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि राज्याचे रोहयो मंत्री जयकुमार रावळ रविवारपासून धुळ्यात तळ ठोकून आहेत. तर गिरीश महाजन हे सोमवारी रात्री धुळ्यात मुक्कामी दाखल झालेत. आता धुळ्यातील सभेत मुख्यमंत्री फडणवीस भाजपच्या अंतर्गत बंडाळीवर काय बोलतात याकडे लक्ष लागलंय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.