Beed : राजकारणात काहीही होऊ शकतं, ‘त्या’ एका वक्तव्याने भाजपामध्ये अस्वस्थता..!

भाजपमधील नेत्यानेच आता असे विधान केल्याने अनेंकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामागचा हेतून वेगळा असला तरी त्या नेत्याची चर्चा आता राज्यभर होऊ लागली आहे. थेट नरेंद्र मोदींबाबत विधान केल्याने चर्चा रंगत आहे.

Beed : राजकारणात काहीही होऊ शकतं, 'त्या' एका वक्तव्याने भाजपामध्ये अस्वस्थता..!
पंकजा मुंडे यांचे वक्तव्य
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 9:34 PM

बीड : सत्तेत असोत अथवा नसो पण भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या कायम चर्चेत असतात. मध्यंतरी विधान परिषदेवर वर्णी लागली नाही तेव्हाही त्या चर्चेत होत्या. आता तर त्यांनी मोठे विधान केले असून पुन्हा त्या चर्चेच्या केंद्रबिंदू राहतील. यावेळी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत हे विधान केले आहे. जर मी तुमच्या मनात असेल तर मोदीजी देखील मला संपवू शकणार नाहीत असे त्या म्हणाल्या आहे. घराणेशाही आणि भाजपाची भूमिका याबद्दल बोलत असताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सक्रीय राजकारणापासून दुरावलेल्या पंकजा मुंडे पुन्हा या वक्तव्यावरुन चर्चेत आल्या आहेत.

नवरात्र महोत्सावाला सुरवात झाली असून पंकजा मुंडे आणि खा. प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या देवींचे दर्शन घेतले आहे. एका कर्यक्रमात भाजप पक्षीत घराणेशाहीला महत्व नाही हे सांगताना त्यांनी हे विधान केले आहे.

मला देखील राजकीय वारसा आहे. पण मला कोणी वारस्याच्या सहायाने राजकारण करते असे म्हणणार नाही. शिवाय मोदीजी देखील मला हरवू शकणार नाहीत, फक्त मी तुमच्या असणे गरजेचे आहे. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राजकारणातूनच महत्वाचे निर्णय होतात. पण याला घराणेशाही लागून आली तर ते शक्य नाही. शिवाय घराणेशाही विरहित राजकारण झाले तरच या क्षेत्रात स्वच्छता येणार आहे. आताच्या तरुण पिढीचे चांगले भवितव्य घडवण्यासाठी राजकारणात बदल महत्वाचे आहेत.

सध्याचे राजकारण म्हणजे एक करमणूकीचे साधन होत आहे. सण उत्सवांना देखील राजकीय स्वरुप दिले जात आहे. यंदाचा गणेशोत्सव, नवरात्र याला देखील राजकीय रंग आहेत. पण हे विकासासाठी चांगले नाही. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला घरचा आहेरच दिला आहे.

सणोत्सवाला राजकीय स्वरुप द्यायचे ही भाजपाची संस्कृती नाही. शिवाय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी यांना देखील न पटणारेच आहे. त्यामुळे राजकारण हे विकासाच्या दृष्टीने होणे महत्वाचे आहे. असे म्हणत त्यांनी शिंदे गट आणि राज्य सरकारवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

Non Stop LIVE Update
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.