‘ठाकरे सरकार ड्रग्स माफियांच्या तालावर नाचतेय’, समीर वानखेडेंवरील आरोपांवरुन भातखळकरांचा घणाघात

समीर वानखेडे यांचं नाव समीर दाऊन वानखेडे असून धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख केलाय. दरम्यान, मलिकांच्या या आरोपांवरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मलिकांवर घणाघाती टीका केलीय.

'ठाकरे सरकार ड्रग्स माफियांच्या तालावर नाचतेय', समीर वानखेडेंवरील आरोपांवरुन भातखळकरांचा घणाघात
नवाब मलिक, समीर वानखेडे, अतुल भातखळकर


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो आणि कागदपत्रांचे फोटो ट्वीट करुन एकच खळबळ उडवूवन दिली आहे. नवाब मलिक यांनी पहचान कौन असं म्हणत वानखेडे यांचा पहिल्या लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे. दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी वानखेडे यांच्या जन्म दाखलाचा फोटो शेअर करत इथूनच घोटाळा सुरु झाल्याचा आरोप केलाय. यात समीर वानखेडे यांचं नाव समीर दाऊन वानखेडे असून धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख केलाय. दरम्यान, मलिकांच्या या आरोपांवरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मलिकांवर घणाघाती टीका केलीय. (MLA Atul Bhatkhalkar criticizes Nawab Malik over allegations against Sameer Wankhede)

‘एका मराठी अधिकाऱ्याविरुद्ध शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले तिघाडी सरकार आकाश पाताळ एक करते आहे. ड्रग्ज माफियांच्या विरोधात कारवाई केल्याबद्दल त्याला धडा शिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरसावले आहेत. ड्रग्ज माफियांच्या तालावर ठाकरे सरकार नाचते आहे’, अशी खोचक टीका भातखळकर यांनी मलिकांच्या आरोपांवर केली आहे.

FIR दाखल करा, भातखळकरांची मागणी

त्याचबरोबर ‘NCB चे डायरेक्टर समीर वानखेडे यांचे बोगस सर्टिफिकेट नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. वानखेडे हिंदू नसून मुस्लीम असल्याचा खोडसाळ दावा केला आहे. ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते बनलेल्या मलिक यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे बनविणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याबद्दल FIR दाखल करावा’, अशी मागणीही भातखळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलीय.

मलिकांच्या आरोपांना वानखेडेंचं उत्तर

समीर वानखेडे यांनी मीडियाशी संवाद साधत मलिकांच्या आरोपांना उत्तर दिलंय. आपल्याबाबत खोटे दस्ताऐवज प्रसिद्ध केले जात आहेत. आपण या प्रकाराला चॅलेंज करणार आहोत. माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. माझा म्हणून जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे. माझ्याविरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे. त्याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे. याबाबत आपण लवकरच जाहीर खुलासा करणार आहे, असं वानखेडे यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

‘समीर वानखेडे प्रकरणावर मुख्यमंत्र्यांसोबत जुजबी चर्चा, तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करु’, गृहमंत्र्यांकडून स्पष्ट

‘शेतकर्‍यांना फुटकी कवडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जातं’, बिलोलीतून फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Atul Bhatkhalkar criticizes Nawab Malik over allegations against Sameer Wankhede

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI