AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे काँग्रेसकडून घ्या, पण मत मला द्या, ओवेसींकडूनही ‘लक्ष्मीदर्शना’चा सल्ला

काँग्रेसकडे खूप पैसा आहे, तो घ्या आणि मला मतदान करा, असं जाहीर आवाहन खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तेलंगणातील एका सभेत केलं.

पैसे काँग्रेसकडून घ्या, पण मत मला द्या, ओवेसींकडूनही 'लक्ष्मीदर्शना'चा सल्ला
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jan 14, 2020 | 11:01 AM
Share

हैदराबाद : निवडणुकांच्या तोंडावर पैशांच्या मोबदल्यात मत विकण्याचा सल्ला देणारे महाभाग नेते नवीन नाहीत. या यादीत आता ‘एमआयएम’चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांची भर पडली आहे. काँग्रेसकडे खूप पैसा आहे, तो घ्या आणि मला मतदान करा, असं जाहीर आवाहनच ओवेसींनी तेलंगणातील एका सभेत (Asaduddin Owaisi on cash and vote) केलं.

काँग्रेसमधील लोकांकडे खूप पैसा आहे, त्यांच्याकडून घ्या. तुम्हाला माझ्यामुळे पैसा मिळेल. फक्त मला मतदान करा. जर ते तुम्हाला (पैसे) देत असतील तर ते घ्या. मी काँग्रेसला दर वाढवण्यास सांगतो. माझी किंमत केवळ दोन हजार रुपये नाही. माझी योग्यता त्यापेक्षा जास्त आहे, असं ओवेसी म्हणाले.

तेलंगणमधील भैंसामध्ये दोन समुदायांमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरही ओवेसींनी भाष्य केलं. मी मुख्यमंत्र्यांकडे सर्व दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी करतो. तसंच पीडितांना नुकसानभरपाई दिली जावी, अशीही मागणी ओवेसींनी केली आहे.

काहीच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनीही अशाचप्रकारचं वक्तव्य केलं होतं. अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यशोमती ठाकूर यांनी मतदारांना अनोखा सल्ला दिला होता.

‘जे लोकं आपल्या विरोधात आहेत, त्यांचे खिसे बंबाटच भरले आहेत. आणि त्यांचे खिसे खाली करायला आपल्या घरी येतच असंल ना. तो उनको नही मत बोलना, घर पे आयी लक्ष्मी को कौन नहीं बोलता है? अरे लेकिन वोट पंजे को डालना’ असं ठाकूर भाषणादरम्यान म्हणाल्या होत्या.

लक्ष्मीदर्शनाचा दानवेंचा सल्ला

भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही डिसेंबर 2016 मध्ये अशाप्रकारचा सल्ला दिला होता. पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी ‘लक्ष्मीदर्शना’संबंधी वक्तव्य केलं होतं. ‘निवडणुकीच्या एक दिवस आधी लक्ष्मी दर्शन होत असते आणि अशी लक्ष्मी जर घरी चालून आली, तर तिला परत करु नका, उलट तिचे स्वागत करा,’ असं वक्तव्य दानवे यांनी केलं होतं.

Asaduddin Owaisi on cash and vote

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!