अरे महाराष्ट्रात सरकार आहे का छळछावणी, काही करणार आहात की नाही; आशिष शेलार संतापले

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.

अरे महाराष्ट्रात सरकार आहे का छळछावणी, काही करणार आहात की नाही; आशिष शेलार संतापले

मुंबई : राज्यातील शाळा (Schools Reopen) सुरु होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. यावरुन आता भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे, भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सरकारच्या कार्यप्रणालीबाबत संताप व्यक्त केला आहे. (Ashish Shelar slams Maha Govt for decision on School Reopening)

आशिष शेलार यांनी आज ट्विट करुन राज्य सरकारला काही सवाल केले आहेत. शेालार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच आहे, पण शासन म्हणून तुम्ही काही करणार आहात की नाही? शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही?

शेलार यांनी म्हटलं आहे की, कोरोनामुळे सध्या पालक आणि विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत, भयभीत आहेत. परिक्षा घेण्यावरुन पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यात आल्या, परंतु त्यावेळीही पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला. अॅडमिशनवरुनही गोंधळ झाला होता. शालेय शुल्क वाढीबाबतही (Fees) शासन हतबल आहे. अभ्यासक्रमाबाबत प्रश्नचिन्ह आहे. शाळा सुरू करण्यातही सावळागोंधळ सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी? असा संतप्त सवालही शेलार यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा सुरु करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरु करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करावा. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत.

या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरु होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरु झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी आणि शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

मुंबईत शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच

मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा या बंदच ठेवण्यात येणार आहेत.

राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे बोलले जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे.

येत्या 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता दिल्लीतील परिस्थिती पाहता 31 डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोरोनाची स्थिती जर वाढली तर विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या

अहमदनगरमध्ये 23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावी शाळा सुरु होणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी

पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार; पालकमंत्री अदिती तटकरे यांचे निर्देश

ठाणे जिल्ह्यातील शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

(Ashish Shelar slams Maha Govt for decision on School Reopening)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI