AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Shelar : आमदार आशिष शेलारांना धमकी देणारा अटकेत, कोण आहे तो व्यक्ती?

आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रारही केली आहे. त्यानंतर शेलार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. गुन्हे शाखा आता आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती मिळतेय.

Ashish Shelar : आमदार आशिष शेलारांना धमकी देणारा अटकेत, कोण आहे तो व्यक्ती?
आशिष शेलार यांना धमकी देणारा व्यक्ती अटकेत
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 6:55 PM
Share

मुंबई : राज्यातील नेते मंडळींना धमकीचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आता भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनाही जीवे मारण्याची धमकी (Death threats) देण्यात आलीय. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रारही केली आहे. त्यानंतर शेलार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. गुन्हे शाखा आता आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती मिळतेय.

आशिष शेलार यांनी अनोळखी नंबरच्या फोनवरुन धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दोन वेगवेगळ्या फोन वरुन आशिष शेलार यांना धमकी देण्यात आल्याचं देखील कळतंय. शेलार यांना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच परवाच्या दिवशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर शेलार यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर आता शेलार यांना धमकी देणाऱ्याला मुंबईच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

आरोपी समशेर खानला अटक

ओसामा समशेर खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याचं वय 48 वर्षे आहे. गुन्हे शाखा आता या आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती मिळतेय. शेलार यांच्या वतीनं वांद्रे पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला होता. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीचा जमिनीबाबतचा एक वाद आहे आणि या वादामागे आशिष शेलार यांचा हात असल्याचा संशय या आरोपीला होता. त्यातूनच त्याने शेलार यांनी धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे.

यापूर्वी 2020 मध्ये अशाच प्रकारे धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. तर त्याआधी आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची दहशतवाद्यांनी रेकी केल्याची माहिती समोर आली होती. त्याच दरम्यान गेले दोन दिवस आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत असल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे.

आदित्य ठाकरेंना धमकी देणारा अटकेत

राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीने खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणात पोलिसांनी बंगळूरूमधून एका 34 वर्षीय तरुणाला अटक केली. आदित्य ठाकरे यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीने ही धमकी पाठवली होती. व्हॉट्सअ‍ॅपवर लिहिलेल्या संदेशामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याचे म्हटले होते.

या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीच्या मागावर होते. अखेऱ बंगळूरुमधून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सायबर पोलिसांनी तात्रिक पद्धतीने तपास करत आरोपीला बड्या ठोकल्या.

महापौर किशोरी पेडणेकरांनाही धमकी

तर गेल्या महिन्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. किशोरी पेडणेकर यांना डिसेंबर महन्यात धमकीचं पत्र आलं होतं. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. महापौर पेडणेकर यांना धमकीचं पत्र आल्याने खळबळ उडाली होती.

इतर बातम्या :

‘मुंबई महापालिकेत 500 कोटींचा भ्रष्टाचार’, भाजप आमदाराचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, कायदेशीर कारवाईचाही इशारा

MumbaiRains | अरे हा तर ‘हिवसाळा’! मुंबईत रिमझिम, उद्या छत्री, रेनकोट सोबत ठेवावा लागणार?

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.