AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रयत्न तर वाझेने पण केले होते, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले वाझे म्हणजे….; वेदांतावरून भातखळकरांचा पुन्हा शिवसेनेला खोचक टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर वेदांता प्रकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेवरून भातखळकर यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

प्रयत्न तर वाझेने पण केले होते, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले वाझे म्हणजे....; वेदांतावरून भातखळकरांचा पुन्हा शिवसेनेला खोचक टोला
| Updated on: Sep 18, 2022 | 8:47 AM
Share

मुंबई :  सध्या वेदांतावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.  वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आल्याने, आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर वेदांता प्रकल्प गुजरातला दिल्याचा आरोप केला जात आहे. तर वीस दिवसांमध्ये एवढा मोठा प्रकल्प दुसरीकडे कसा जाऊ शकतो? असे म्हणत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका केली जात आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने प्रकल्पासाठी वेळ न दिल्यानेच तो राज्याबाहेर गेल्याचा आरोप भाजप (BJP), शिंदे (Eknath Shinde) गटाच्या वतीने करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे. प्रकल्प राज्यात आणण्यासाठी मविआ सरकारने खूप प्रयत्न केले, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्यावरू आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

भातखळकर नेमकं काय म्हणाले?

प्रकल्प राज्यात आणण्यासाठी मविआ सरकारने खूप प्रयत्न केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.  त्यानंतर अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘प्रकल्प राज्यात आणण्यासाठी मविआ सरकारने खूप प्रयत्न केले : उद्धव ठाकरे यांची वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या वादावर प्रतिक्रिया. प्रयत्न वाझेने पण केले होते. बंगला शोधण्याचे? खाली जिलेटिनवाली गाडी उभी करण्याचे. तोच वाझे जो लादेन नाही, असे निर्भिड मत उद्धवजींनी व्यक्त केले होते’. असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.

चित्रा वाघ यांची टीका

दरम्यान दुसरीकडे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील उद्धव ठाकरेंनी वेदांतांवर दिलेल्या प्रतिक्रेवरून निशाणा साधाला आहे. ‘मविआ काळात हा प्रकल्प राज्यात येणार होता असे उद्धवजी म्हणतायत म्हणजे आलेला नव्हता हे मान्य करतायत … म्हणजे जो आलाच नाही..तो प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, असा यांचा दावा आहे…’ असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

Follow Us
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर