Tukaram Mundhe : ‘सर्वांना माहितीये मुंढेंची बदली…’, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं मोठं विधान, पोस्ट सर्वत्र चर्चेत
Tukaram Mundhe : सध्या सर्वत्र तुकाराम मुंढे यांच्या कार्यक्रमाचं कौतुक होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने देखील एक पोस्ट करत तुकाराम मुंढे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आणि फायरब्रँड अधिकारी तुकाराम मुंढे त्यांच्या धडक कारवायांमुळे तुफान चर्चेत आहेत. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कारवाया सुरु करत संबंधिक हॉटेल आणि व्यक्तींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, स्वच्छता आणि नियमांचं पालन न करणारे रेस्टॉरंट, हॉटेल्स यांवर त्यांनी थेट कारवाई केली आहे. यामुळे त्यांची ओळख आता खऱ्या आयुष्यातील ‘सिंघम’ म्हणून होत आहे. त्यांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तर अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने देखील त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
देवोलिना हिने सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर करत तुकाराम मुंडे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. एक्सवर ट्विट करत अभिनेत्री म्हणाली, ‘एका प्रामाणिक ऑफिसरने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला आहे आणि अनेकांनी त्यांच्या कामाचं कौतुक देखील केलं आहे. प्रत्येक विभागात असे अधिकारी असतील तर, कायदे आणि नियम मोडमाऱ्यांना आधी 10 वेळा विचार करावा लागेल.’
Imagine…one honest officer has shaken the entire Maharashtra, and the public is applauding his work. If every department had officers like him, criminals would think a hundred times before breaking the law.
Sadly, as per the judiciary, even finding three cockroaches in food… https://t.co/D0HQOjMTgC
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) August 13, 2026
पुढे देवोलिना म्हणाली, ‘पण दुर्दैवाने कायद्यानुसार जेवणात 3 झुरलं सापडल्याने त्याचं लायसन्स रद्द करता येत नाही आणि सर्वांना माहिती आहे की, मुंढे सरांची ट्रान्सफर किती वेळा झाली आहे. प्रामाणिकपणाची खूप मोठी किंमत मोजावी लागते… या पदावर ते किमान जास्त वेळ रुजू राहतील अशा अपेक्षा आहे…’ असं देखील अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणाली आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, दिलेलं काम अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि नियमांनुसार करत असतानाही तुकाराम मुंढेंना आजवर अनेकदा बदल्यांना सामोरं जावं लागलं आहे.
