AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही’, अतुल भातखळकरांचा शरद पवारांना टोला

शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढेही महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा दावा केलाय. पवारांच्या या दाव्याला आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय.

'दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही', अतुल भातखळकरांचा शरद पवारांना टोला
अतुल भातखळकर, शरद पवार
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 12:21 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढेही महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा दावा केलाय. पवारांच्या या दाव्याला आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय. दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही, असा टोला भातखळकर यांनी पवारांना लगावलाय. (Atul Bhatkhalkar’s criticism after Sharad Pawar’s claim about MahaVikas Aghadi government)

‘महाविकास आघाडी पाच वर्षे टिकेल आणि नंतरही सत्तेत येईल इति शरद पवार. महा विकास आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा पंढरपूरला दाखवून दिलेच आहे. आता परत देगलूर बिलोलीलाही दिसेल. बाकी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही’, असं ट्वीट करुन भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधलाय.

शरद पवार यांचा दावा काय?

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी रविवारी रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालं. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणत होते की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पण ते आतापर्यंत आलेच नाहीत. भाजपचे नेते सांगतात महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल. पण दोन वर्षे झाली, सरकार खंबीरपणे उभं आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जर महाविकास आघाडी अशीच अबाधित राहिली तर पुढेही उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत येईल. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना नेतृत्व कोणाकडे द्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षातील नेते आणि आमदारांची बैठक झाली. त्यावेळी आमच्याकडे दोन तीन जणांची नवे पुढे आली. परंतु मी कुठलाही वेळ ना लावता उद्धव ठाकरेंचा हात धरुन वर केला. आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले. मात्र उद्धव ठाकरे तयार नव्हते. मात्र माझ्या एका शब्दावर त्यांनी मुख्यमंत्री होण्याचे मान्य केलं, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

‘देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे’

केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. पण ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही. आता सत्ता त्याच्या हातात आहे म्हणून ते काही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे, असं आवाहनही शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना केलंय. ज्याच्या हातात सत्ता दिली त्यांनी शहराचं वाटोळं केलं. त्यांना खड्यासारखं बाजूला करा. ज्यांनी शहर घडवलं त्या राष्ट्रवादीच्या हातात पुन्हा सत्ता द्या, असंही पवार यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

पिंपरीत पेन्सिलीनचा कारखाना कसा सुरु झाला? पवारांनी थेट गांधीबाबाची गोष्ट सांगितली

विश्वजित कदमांना ‘करेक्ट कार्यक्रम’ची आठवण, तर ‘मी छोटा माणूस’ म्हणत जयंत पाटलांची टोलेबाजी, दोन्ही नेत्यांच्या भाषणाची चर्चा

Atul Bhatkhalkar’s criticism after Sharad Pawar’s claim about MahaVikas Aghadi government

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.