औरंगाबादेत भाजप प्रदेश उपाध्यक्षाच्या घरावर दगडफेक, गाड्याही फोडल्या

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांच्या घरावर शुक्रवारी (21 फेब्रुवारी) हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी घरासमोर उभ्या असलेल्या दोन गाड्या फोडल्या आहेत.

Attack On BJP Leader House, औरंगाबादेत भाजप प्रदेश उपाध्यक्षाच्या घरावर दगडफेक, गाड्याही फोडल्या

औरंगाबाद : औरंगाबादेत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ला (Attack On BJP Leader House) झाला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांच्या घरावर शुक्रवारी (21 फेब्रुवारी) हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी घरासमोर उभ्या असलेल्या दोन गाड्या फोडल्या. भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हा हल्ला कोणी केला (Attack On BJP Leader House), हल्लेखोरांचा उद्देश काय होता या सर्वबाबींचा तपास पोलीस करत आहेत.

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजप वि. शिवसेना

औरंगाबाद शहरात महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षातील वाद विकोपाला जाऊ लागला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांच्या घरावर शुक्रवारी सायंकाळी राजकीय वैमनस्यातून हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात भागवत कराड यांच्या घरासमोरील दोन गाड्या फोडण्यात आल्या. शिवाय, घरावर दगडफेकही करण्यात आली.

भाजपमधून नुकतेच शिवसेनेत गेलेल्या किशनचंद तनवाणी यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपच्या गोटातून करण्यात आला आहे. भाजप सोडून शिवसेनेत गेलेल्या तनवाणी यांच्यावर टीका करताना कराड यांनी “तनवाणी हा सत्तेला चिकटलेला मुंगळा आहे”, असं म्हटलं होतं. त्यामुळेच हा हल्ला झाला असा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांकडून दोघांना अटक

हल्ल्यानंतर भाजप कर्यकर्त्यांनी तातडीने क्रांती चौक पोलीस स्टेशन गाठून आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. क्रांती चौक पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. तर एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. संतोष सुरे, रंगनाथ राठोड यांना अटक करण्यात आली आहे. तर सचिन जव्हेरी याला ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील तपास क्रांती चौक पोलीस करत आहेत (Attack On BJP Leader House). घडलेल्या प्रकारामुळे औरंगाबाद शहरात भाजप आणि शिवसेना या दोन पक्षातील राजकीय वाद आता विकोपाला गेला असल्याचं चित्र आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *