औरंगाबाद पदवीधर निवडणूक : अपक्ष उमेदवाराला तीन पक्षांचा पाठिंबा

आदिवासी नेते रामराजे आत्राम यांना लातूरमध्ये तीन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.

  • महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर
  • Published On - 14:20 PM, 29 Nov 2020
औरंगाबाद पदवीधर निवडणूक : अपक्ष उमेदवाराला तीन पक्षांचा पाठिंबा

औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीच्या (Aurangabad graduate constituency 2020 ) रिंगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवाराला तीन पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. आदिवासी नेते आणि ज्येष्ठ साहित्यिक रामराजे आत्राम यांच्या आव्हानामुळे चुरस वाढण्याची शक्यता आहे. (Aurangabad graduate constituency election Independent Candidate backed by three parties)

रामराजे आत्राम यांना लातूरमध्ये तीन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. रामराजे आत्राम हे लातूरचे स्थानिक उमेदवार आहेत. बहुजन भारत पार्टी, बहुजन क्रांती दल आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला.

दुसरीकडे, औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे मनसुबे यंदा धुळीस मिळण्याची शक्यता जास्त आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना या मतदारसंघात भाजपसाठी प्रतिकूल गोष्टी घडताना दिसत आहेत. भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि थेट राष्ट्रवादीत सामील झाले.

भर म्हणून भाजपचे बंडखोर उमेदवार रमेश पोकळे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला नकार दिला. त्यामुळे आता निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये फूट पडणार, हे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने ईश्वर मुंडे यांची समजूत काढून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण निश्चिंत झाले आहेत. सतीश चव्हाण यांची ही सलग तिसरी निवडणूक आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या ताकदीमुळे ही निवडणूक अगोदरपासूनच भाजपसाठी अवघड मानली जात होती. त्यामध्ये बंडखोरीची भर पडल्याने यंदा भाजपसाठी मराठवाड्याचा गड काबीज करणे जवळपास अशक्यप्राय बाब मानली जात आहे. मात्र, यानंतरही भाजप राजकीय चमत्कार करुन ही लढाई जिंकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मराठवाडा पदवीधरची आमदारकीची जागा गेल्या दोन निवडणुका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ती खेचून आणण्यासाठी भाजप शक्य ते प्रयत्न करताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी राजकारणातले सगळेच छक्के-पंजे वापरून आपली बाजू भक्कम करतेय. त्यामुळे या लढाईत कोणाचा विजय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Aurangabad graduate constituency election Independent Candidate backed by three parties)

संबंधित बातम्या :

औरंगाबाद पदवीधर मतदरासंघाची लढाई भाजपसाठी अवघड

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

(Aurangabad graduate constituency election Independent Candidate backed by three parties)