‘मशिद उघडून नमाज करणार’, खासदार इम्तियाज जलील यांची घोषणा

एमआयएमचे खासदार इम्तियाज यांनी आज (2 सप्टेंबर) औरंगाबादमधील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा केली आहे (Aurangabad MP Imtiyaz Jalil announce to reopen masjid).

'मशिद उघडून नमाज करणार', खासदार इम्तियाज जलील यांची घोषणा

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज यांनी आज (2 सप्टेंबर) औरंगाबादमधील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा केली आहे (Aurangabad MP Imtiyaz Jalil announce to reopen masjid). त्यामुळे मंगळवारप्रमाणे आजही औरंगाबादमध्ये तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जलील आज दुपारी शहागंज येथील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय.

दरम्यान, मंगळवारी इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमधील खडकेश्वर मंदिर उघडण्यासाठी निवेदन देणार असल्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. बराच काळ औरंगाबादमधील वातावरण देखील तणावपूर्ण झालं. त्यामुळे आजही शहरात कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये अद्याप धार्मिक स्थळांना उघडण्याची परवानगी मिळालेली नाही. असं असतानाही इम्तियाज जलील यांनी केलेल्या या घोषणेमुळे पोलीस प्रशासन आणि एमआयम कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, राज्यातील सर्व मंदिरं उघडा या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी काल आक्रमक होत केलेल्या आंदोलनानंतर शिवसेना आणि एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इम्तियाज जलील यांच्या या भूमिकेला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला आहे. “हिंदू मंदिरं उघडा सांगणारे तुम्ही कोण?”, असा थेट सवाल त्यांनी इम्तियाज जलील यांना विचारला आहे (Imtiaz jaleel and Chandrakant Khaire on open temple).

चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील काय म्हणाले?

चंद्रकांत खैरे – आमच्या मंदिरात एमआयएमचे लोक येत असतील तर आम्ही गप्प बसायचं का? मंदिरं उघडण्यासाठी एमआयएमने आंदोलन करुच नये. मुख्यमंत्र्यांनी मंदिरं आठ-दहा दिवसात सुरु करणार असं सांगितलं आहे.

इम्तियाज जलील – माझ्या पक्षाचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी आहेत. चंद्रकांत खैरे यांच्या आदेशावरुन मी आंदोलन करत नाही. मी आंदोलन करु नये, असं चंद्रकांत खैरे सांगत असतील, तर मी त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. माझा वेगळा पक्ष आहे. चंद्रकांत खैरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं. त्यांनी आपल्या पक्षप्रमुखांना सांगावं की, आता खूप वेळ झाली आहे. लोक आता रस्त्यावर येत आहेत. लोकांसमोर जायला आम्हाला खूप त्रास होत आहे. लोक आम्हाला प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे आपण सर्व सुरु केले आहेत. तर फक्त मंदिरं का बंद ठेवले आहेत? हे मुख्यमंत्र्यांना सांगा.

इम्तियाज जलील – 20 वर्षे मंदिराचा मुद्दा धरुन ठेवला आणि सत्ता आल्यावर देवाला विसरुन जायचं? पण मंदिरात जाणारे श्रद्धाळू भाविक माझ्याजवळ येऊन मंदिर उघडण्याबाबत सांगतात. सरकार झोपलेले आहे. त्यामुळे नाईलाजाने मला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे.

चंद्रकांत खैरे – इम्तियाज जलील म्हणतात, मी मुख्यमंत्र्यांना निर्देश द्यावे. मी मुख्यमंत्र्यांचा शिवसैनिक आहे. मी त्यांना याआधी मंदिरं उघडण्यासाठी विनंती केली होती. पण सध्या कोरोनाची राज्यात भयानक परिस्थिती आहे. सर्व लढत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंदिरं लवकर सुरु करण्याचे आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जलील यांच्यासोबत तीन-चार वेळा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे. जलील यांनी सांगितलेल्या समस्या मुख्यमंत्र्यांनी सोडवलेल्या आहेत.

चंद्रकांत खैरे – मी 1990 साली पहिला हिंदू खासदार निवडून आलो. मी एकही दंगल होऊ दिली नाही. पण हे निवडून आल्यापासून दंगत होत आहेत. आम्ही लोकांची सेवा केली. जलील फक्त राजकारण करतात.

इम्तियाज जलील – सरकार मंदिरामध्ये कमीत कमी 25 जणांना परवानगी देत असतील तर आम्ही आंदोलन मागे घेऊ. पण आता मंदिरावर लॉक आम्ही सहन करणार नाहीत. त्याचबरोबर बुद्ध विहार, मशिदीवर टाळे आम्ही सहन करणार नाहीत. खैरे साहेब तुम्हीही आमच्यासोबत या. तुम्ही आले तर आपण सरकारवर खूप मोठा प्रेशर टाकू.

चंद्रकांत खैरे – सरकारनर प्रेशर टाकण्याची गरज नाही. मुख्यमंत्री जनतेसाठी करत आहेत. मात्र, हे राजकारण करत आहेत.

इम्तियाज जलील – मी माझं आंदोलन मागे घेत आहे. राज्य सरकारने मंदिराबाहेर बसणारे फुलवाले, नारळवाले, अगरबत्ती आणि इतर पूजा साहित्य विक्री करणाऱ्यांसाठी प्रत्येकी दहा हजारांच पॅकेज जाहीर करावं. मी आंदोलन मागे घेतो.

चंद्रकांत खैरे – सर्वकाही होईल.

इम्तियाज जलील – तुम्ही घोषित करा. मी आंदोलन मागे घेतो.

चंद्रकांत खैरे – तुम्ही आंदोलन मागे घ्या किंवा नका घेऊ. तो तुमचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री आठ ते दहा दिवसात मंदिर सुरु करतील. आमच्या मंदिरांची आणि मंदिरासमोर बसणाऱ्या फुलवाल्यांची काळजी करु नका. तुम्ही मशिदीबाहेर बसणाऱ्यांची काळजी करा.

इम्तियाज जलील – खैरे साहेब लोकप्रतिनिधी सर्व धर्मांसाठी कामं करतात. मी हिंदू, मुस्लिम, दलित आणि शिखांचाही आहे.

संबंधित बातम्या :

मंदिरं उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक, औरंगाबादेत मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार

‘आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन

Aurangabad MP Imtiyaz Jalil announce to reopen masjid

Published On - 8:04 am, Wed, 2 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI