काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोलेंच्या नावाची घोषणा, अजित पवार उपमुख्यमंत्री?

उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार हे घेतील, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. मात्र टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार (Ajit pawar deputy cm)  यांनाच उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हं आहेत.

काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोलेंच्या नावाची घोषणा, अजित पवार उपमुख्यमंत्री?

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची बहुमत चाचणी (CM Uddhav Thackeray Floor test) आज होत आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने 170 जणांचं संख्याबळ (Nana Patole Speaker and Ajit Pawar may DCM) असल्याचा दावा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपद यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असलेला वाद आता शमला आहे. कारण विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडे राहणार आहे. (Nana Patole Speaker and Ajit Pawar may DCM)

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसने ज्येष्ठ आमदार नाना पटोले (Nana Patole) यांचं नाव निश्चित केलं आहे. त्यांचा अर्ज काँग्रेस दाखल करणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार हे घेतील, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. मात्र टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार (Ajit pawar deputy cm)  यांनाच उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हं आहेत.

आमच्याकडे बहुमत आहे आणि विश्वासदर्शक ठराव आम्ही जिंकू त्याची मला खात्री आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असेल, मात्र कोण होईल याचा निर्णय शरद पवार घेतील. भाजप जो आरोप करत आहे हंगामी अध्यक्ष आम्ही निवडला आहे, तर त्यांना तसं बोलण्याचा अधिकार आहे- जयंत पाटील

विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडून दोन दिवसापर्यंत  जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अजित पवार यांच्या घरवापसीनंतर त्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात (Ajit pawar deputy cm) रंगली आहे. यामुळे राष्ट्रवादीकडून नेमकं कोण उपमुख्यमंत्री होणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

आठवडाभरात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री?

दरम्यान, अजित पवार यांच्या नावाची घोषणा झाली तर ते आठवडाभरात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री होतील. अजित पवार यांनी गेल्या शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

अजित पवारांचे पुनरागमन

अजित पवार यांनी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे गेले काही दिवस पवार कुटुंबात तणाव होता. मात्र अजित पवार यांनी 26 नोव्हेंबरला राजीनामा देत घरवापसी केली. अजित पवार हे 26 तारखेलाच शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकमध्ये गेले होते. यावेळी छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. अजित पवारांच्या पुनरागमनासोबतच पवार कुटुंबातील ताणही विरल्याचं चित्र आहे. ‘दादाचंच घर आहे, त्याला वेलकम करण्याचा प्रश्नच येत नाही’ अशी प्रतिक्रियाही सुप्रिया सुळेंनी दिली होती.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI