फडणवीसांचा निकटवर्तीय अपक्ष आमदार पवार-ठाकरेंना भेटणार

बार्शीच्या विकास कामासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितलं.

फडणवीसांचा निकटवर्तीय अपक्ष आमदार पवार-ठाकरेंना भेटणार
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 3:16 PM

सोलापूर : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय असलेला सोलापुरातील अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहे. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महसूल मंत्री तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना भेटणार आहेत. कोणी ध चा म करायला नको, म्हणून मी आधीच सांगतो, की पवार साहेबांना भेटायला जाणार आहे, असं सांगायला राऊत विसरले नाहीत. (Barshi Independent MLA Rajendra Raut to meet Sharad Pawar)

वरिष्ठ पातळीवर राजकारणात आमदार कोणत्या पक्षाचा आहे, हे पाहिलं जात नसल्याचं राजेंद्र राऊत म्हणाले. बार्शी शहर आणि तालुक्याच्या विकास कामासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

तिन्ही नेत्यांची भेट घेऊन बार्शी तालुक्यासाठी निधी आणि अनुदान उपलब्ध करुन देणार आहे. विकासाची अडचण असल्यास आपल्याला भेटत जा, असा शब्द शरद पवार यांनी दिल्याचा दावा राजेंद्र राऊत यांनी केला. आमदार राजेंद्र राऊत यांची देवेंद्र फडणवीस आणि भाजपशी चांगली जवळीक आहे.

कोण आहेत राजेंद्र राऊत?

– सोलापूर जिल्ह्यातील अपक्ष आमदार

– राजेंद्र राऊत बार्शी मतदारसंघातून विधानसभेवर

– 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर आमदार

– 2019 मध्ये शिवसेना उमेदवार आणि माजी आमदार दिलीप सोपल यांचा राजेंद्र राऊतांकडून पराभव

– सहा वेळा आमदारकी भूषवलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप सोपल यांचा पराभव

– 2019 मध्ये अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राजेंद्र राऊत विजयी

(Barshi Independent MLA Rajendra Raut to meet Sharad Pawar)

राजेंद्र राऊत काय म्हणाले?

“बऱ्याच जणांना वाटतं सरकार नसल्यामुळे तुम्ही कामं कशी करणार? पण जो हाडाचा काम करणारा कार्यकर्ता असतो, त्याला शेवटी माहित असतं. ही सरकारी कामं आहेत, मला काय व्यक्तिगत कुठल्या सरकारकडून टेंडर घ्यायचं नाही. सरकार विरोधातलं असलं, तरी जे काही आमचे संबंध आहेत, त्यामुळे मी शरद पवारांना भेटणार आहे. बार्शी उपसा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावायचा आहे” असं राजेंद्र राऊत म्हणाले.

“कोणी ध चा म करायला नको, म्हणून मी आधीच सांगतो, की पवार साहेबांना भेटायला जाणार आहे. जेव्हा डॉ. पद्मसिंह पाटील निवडणुकीला उभे राहिले होते, त्यावेळी बार्शीच्या लीडवर ते निवडून आले. तेव्हा पवार साहेबांनी माझे आभार मानले होते आणि म्हणाले होते की राऊत, कुठल्या विकासकामाची अडचण आली, तर जरुर मला भेटत चला. तुम्हाला मी कामात मदत करेन. आपल्या बार्शीच्या राजकारणात जी खुन्नस किंवा कुटील राजकारणाची पद्धत आहे. ती वरील राजकारणात नाही” असंही राजेंद्र राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या :

सांगलीत शिवसेनेचा धक्का, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भाजप नेत्यांना शिवबंधन

राष्ट्रवादीकडून घरवापसीची साद, गणेश नाईक भाजप सोडणार?

(Barshi Independent MLA Rajendra Raut to meet Sharad Pawar)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.