AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारसाहेबांचा आदेश सिर आंखों पर!, आता परळीतील चित्र बदलणार; धनंजय मुंडेंच्या समर्थकाची शरद पवार यांना साथ

Gitte inter in NCP Sharad Pawar Sabha : पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादीत; पक्षप्रवेशाआधी घेतलं परळी वैजनाथाचं दर्शन... शरद पवार आजच्या सभेत काय बोलणार? राज्याचं लक्ष, वाचा सविस्तर...

पवारसाहेबांचा आदेश सिर आंखों पर!, आता परळीतील चित्र बदलणार; धनंजय मुंडेंच्या समर्थकाची शरद पवार यांना साथ
Image Credit source: Sharad Pawar FB
| Edited By: | Updated on: Aug 17, 2023 | 3:23 PM
Share

बीड | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बीडमध्ये आज जाहीर सभा होत आहे. यासभेत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक बबन गित्ते हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाआधी त्यांनी परळी वैजनाथाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी निर्धार बोलून दाखवला. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी मी आज हजारो समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे, असं बबन गित्ते यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बीडमध्ये आहेत. तिथे त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. तसंच काही पक्षप्रवेशही या सभेत होणार आहेत.

आगामी काळात विधानसभेसाठी शरद पवारसाहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे काम करणार. मुंडे बंधू-भगिनींनी पंचायत समितीच्या निवडणुकीत युती केली होती. मात्र आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि शरद पवार साहेबांसाठी काम करणार आहे. आगामी निवडणुकीत पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे परळीचे चित्र बदलू शकतं, असं गित्ते म्हणाले आहेत.

बीडच्या शरद पवारांच्या सभेसाठी परळीतून 700 गाड्यांचा ताफा बीडच्या दिशेने रवाना झाला आहे. परळीतील जनक्रांती सेनेचे प्रमुख बबनराव गित्ते आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. बबनराव गित्ते हे आपल्या हजारो समर्थकासह आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. बबनराव गित्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कारण्यापूर्वी परळी वैजनाथाचे दर्शन घेऊन त्यांना साकडं घातलं आहे.

परळीतील शरद पवार समर्थकांकडून बीडकडे जाताना बबन गित्ते यांचा सत्कार करण्यात आला. आज बीड येथील सभेमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत बबन गित्ते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बीड ला जाताना गित्ते यांचे शिरसाळा गावात जंगी स्वागत करण्यात आलं. मोठ्या संख्येने युवक यावेळी उपस्थित होते.

शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा होतेय. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. धनंजय यांच्या होम ग्राऊंडवर पवारांची सभा होतेय. त्यामुळे या सभेत शरद पवार काय बोलणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.