मोठी बातमी ! पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी, बीडमध्ये भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांचे राजीनामे

बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बीडमध्ये राजीनामा सत्र सुरुच असून भाजपचे विविध पदाधिकारी नाराजी व्यक्त करत राजीनामा देत आहेत. यापूर्वी 14 भाजप समर्थकांनी राजीनामा दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण 25 […]

मोठी बातमी ! पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी, बीडमध्ये भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांचे राजीनामे
पंकजा मुंडे, भाजप
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 7:33 PM

बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बीडमध्ये राजीनामा सत्र सुरुच असून भाजपचे विविध पदाधिकारी नाराजी व्यक्त करत राजीनामा देत आहेत. यापूर्वी 14 भाजप समर्थकांनी राजीनामा दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण 25 पदाधिकाऱ्यांनी राजीमाना दिला आहे. बीडमधील या राजीनामासत्रामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. (Beed BJP 11 Taluka president gave resignation due to minister post not given to Pritam Munde)

सर्वच 11 तालुकाध्यक्षांचा राजीनामा

मोदी सरकार म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना स्थान मिळाले. मात्र, खासदार प्रितम मुंडे यांना कोणतेही मंत्रिपद दिले गेले नाही. याच कारणामुळे बीडमधील भाजप पदाधिकारी नाराज आहेत. याच नाराजीतून बीड जिल्ह्यातील सर्वच भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. यामध्ये परळीसह एकूण 11 तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. या 11 तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर भाजपला रामराम ठोकणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या आता 25 वर पोहोचली आहे.

याआधी 14 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यानंतर मुंडे यांनी मी नाराज नसल्याचे माध्यमांसमोर सांगितले. पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम मिळेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र याच क्षणी बीडमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. बीड जिल्ह्यातील मुंडे भगिनींचे समर्थक असलेले भाजप पदाधिकारी प्रचंड नाराज असल्याचे समोर येत आहे. 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामा देण्यापूर्वी येथे एकूण 14 भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. यामध्ये  भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांचासुद्धा समावेश आहे. या राजीनाम्यांमुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली.

दरम्यान, प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमडंळात स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. या चर्चेवर भाष्य करताना मी नाराज नसल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे बीड जिल्ह्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देणे सुरु केले आहे. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

कृषी मंत्र्यांची समयसूचकता, मास्क नसलेल्या शेतकऱ्याला स्वत:जवळचा रुमाल दिला, मास्क म्हणून वापरण्याचा सल्ला

‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार’!, प्रसाद लाड यांचा भाई जगतापांना खोचक टोला

Video | “हमारा नेता कैसा हो…” म्हणताच बैलगाडी तुटली, काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप कोसळले, व्हिडीओ व्हायरल

(Beed BJP 11 Taluka president gave resignation due to minister post not given to Pritam Munde)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.