काँग्रेससोबत 2014 मध्ये धोका, मला कालच्या भेटीचं निमंत्रणच नव्हतं, नानांचं पवारांकडे बोट?

काँग्रेससोबत 2014 मध्ये धोका, मला कालच्या भेटीचं निमंत्रणच नव्हतं, नानांचं पवारांकडे बोट?
नाना पटोले

काँग्रेस नेते काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) भेटले. पण या भेटीसाठी मला शरद पवारांचं निमंत्रणच नव्हतं, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Jul 14, 2021 | 1:34 PM

मुंबई : काँग्रेससोबत 2014 मध्ये धोका झाला. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची (Congress NCP) आघाडी तुटली होती. काँग्रेस नेते काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) भेटले. पण या भेटीसाठी मला शरद पवारांचं निमंत्रणच नव्हतं, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी काल शरद पवारांची भेट घेतली. मात्र या बैठकीला नाना पटोले नव्हते.

त्याबाबत आज पत्रकारांनी नानांना विचारलं. त्यावर नाना म्हणाले, “अरे भाई गुस्से की बात नही, मला पवारसाहेबांचं निमंत्रण नव्हतं, की नानांना घेऊन या वगैरे, मला त्या भेटीची माहितीही नव्हती. आमचे नेते त्यांना भेटल्यावर मी विचारलं, त्यावर त्यांनी मला सांगितलं ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यामुळे माझा राग वगैरे काहीही नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतोय, जर माझ्या पक्षाचं काम करताना जर कोणाला राग येत असेल तर मला काही अडचण नाही”

2014 मध्ये काँग्रेसशी धोका झाला, 2024 मध्ये आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

भाजपविरोधात आंदोलन

आगामी निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. महाआघाडीत कोणतेही फेरबदल सध्यातरी नाहीत. हायकंमाड जे निर्देश देतील त्यावर मी काम करतो. भाजपला पर्याय फक्त काँग्रेस आहे, ओबीसींचं आरक्षण भाजपने संपवले त्याविरोधात राज्यात आम्ही आंदोलन करणार आहोत, असं नाना पटोलेंनी सांगितलं.

फडणवीसांकडून दिशाभूल

मी माझ्या पक्षाचं काम करतोय, 2024 मध्ये काँग्रेस पक्ष देशात सरकार बनवेल. खडसेंचं राजकीय खच्चीकरण फडणवीस यांनी केले, जर चौकशी झाली तर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येतील. लोकांची दिशाभूल करण्याचं काम फडणवीस करतात. उद्या भाजपमुळे देशात जी परिस्थिती आहे, त्याासंदर्भात राज्यापालांना निवेदन देणार आहे. पक्षाचं काम पक्ष करणार, सरकार सरकारचं काम करेल. मला भाजपवर अटॅक करायची जबाबदारी दिलेय, मी रोज भाजपच्या नितीवर अटॅक करत राहणार, असंही नाना पटोले म्हणाले.

VIDEO : नाना पटोले नेमकं काय म्हणाले? 

संबंधित बातम्या  

VIDEO: तुम्ही खरच एकटं लढणार आहात का?…तसं स्पष्ट सांगा; पवारांची काँग्रेस नेत्यांना विचारणा

VIDEO: थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ; मुख्यमंत्र्यांचे काँग्रेस नेत्यांना चिमटे

पवार म्हणतात, ‘नाना छोटे माणूस’, राऊत म्हणाले, ‘लहाण माणसेही राजकारण ढवळून काढतात, नानांच्या कार्यकुशलतेची हीच पोचपावती!’

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें