राज्यपाल म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील ‘त्या’ कलाकारासारखे; काँग्रेस नेत्याचा खोचक टोला

एकीकडे राज्यपाल कोरोना काळातील कामगिरीबद्दल सरकारचे कौतुक करतात, दुसरीकडे राज्यपाल राज्य सरकारशी संघर्ष करतात. | Bhagat singh Koshyari

  • योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 9:51 AM, 3 Mar 2021
राज्यपाल म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील 'त्या' कलाकारासारखे; काँग्रेस नेत्याचा खोचक टोला
12 आमदारांवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय.

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari ) म्हणजे हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी असल्याचा उपरोधिक टोला पुणे जिल्ह्यातील काँग्रेस आमदार आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी लगावला. ते बुधवारी विधानसभेत (Budget Session 2021) बोलत होते. (Congress MLA Sanjay Jagtap taunts Governor Bhagat singh Koshyari)

विधानभवनात राज्यपालांच्या अभिभाषणानंतर झालेल्या भाषणात आमदार संजय जगताप यांनी राज्यपालांवर टीका केली. एकीकडे राज्यपाल कोरोना काळातील कामगिरीबद्दल सरकारचे कौतुक करतात, दुसरीकडे राज्यपाल राज्य सरकारशी संघर्ष करतात. राज्यपालांची ही कृती म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार कन्हैयालाल चतुर्वेदीसारखी असल्याची खोचक टिप्पणी संजय जगताप यांनी केली. 12 आमदारांवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय. यावेळी संजय जगताप यांनी कोरोना काळात आपल्या मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती विधानभवनात दिली.

‘आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबलेले आमदार मोकळे करा’

आमचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे करुणेचा सागर आहेत. करुणा भावनेने त्यांना कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. राज्यपालांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवलेले 12 राज्यपाल नियुक्त सदस्य मोकळे करावेत, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला होता.

राज्य सरकार-राज्यपाल वाद

विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवून कित्येत महिने उलटले आहेत. मात्र अद्याप या नावांना राज्यपालांकडून मंजुरी मिळालेली नाही. याच कारणामुळे राज्य सरकारने राज्यपाल कोश्यारी यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अनेकवेळा टीका केली आहे. राज्यपाल हे भाजपधार्जीणे असल्याचं महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी अनेक वेळा म्हटलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष असल्यामुळे मोठ्या मुश्किलीने 12 आमदारांच्या नावांवर एकमत झाले होते. त्यानंतर या नावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी सरकारची भूमिका राहिलेली आहे. त्यासाठी राज्य सरकारने राजभवनाशी अधिकृतपणे अनेकवेळा पत्रव्यवहार केलेला आहे. पण अजूनही 12 आमदारांची यादी राज्यपालांच्या दफ्तरीच पडून आहे.

संबंधित बातम्या:

मी राज्यपाल नाही, तर राज्यसेवक आहे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरले!

Special Report | राज्यपाल आणि सरकारमधील संघर्ष वाढणार?

(Congress MLA Sanjay Jagtap taunts Governor Bhagat singh Koshyari)