‘उद्धव ठाकरे आता शिल्लक सेनेचे’… भाजपाच्या खिल्लीला भास्कर जाधव यांचं उत्तर, अटल बिहारी वाजपेयींचा तो किस्सा सुनावला….

महाराष्ट्रात 30-35 वर्ष, बऱ्या वाइट प्रसंगात भाजपाला साथ देण्याची भूमिका शिवसेनेने बजावली आहे, हेही भास्कर जाधव यांनी लक्षात आणून दिलं..

'उद्धव ठाकरे आता शिल्लक सेनेचे'... भाजपाच्या खिल्लीला भास्कर जाधव यांचं उत्तर,  अटल बिहारी वाजपेयींचा तो किस्सा सुनावला....
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 12:00 PM

मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख पदाची मुदत आज संपतेय. त्यामुळे ठाकरे हे आता शिल्लक सेनेचे प्रमुख राहतील, अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. यावरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. सत्तेची मस्ती असलेल्या भाजपला या देशात लोकशाही, संविधान टिकवून ठेवायचं नाहीये. आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे याच भूमिकेतून टीका करतायत, अशा शब्दात त्यांनी भास्कर जाधव यांनी दिलं. यावेळी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा किस्साही सांगितला..

भास्कर जाधव काय म्हणाले?

1984 साली देशात भाजपचे दोनच खासदार होते. त्याही वेलेला भाजपची कुणी शिल्लक सेना अशी खिल्ली केली नव्हते. पण आज शिवसेनेवर चालवलेली टीका निंदनीय असल्याचं मत भास्कर जाधव यांनी मांडलं.

अटल बिहारी वाजपेयींचा तो किस्सा…

पूर्वी भारतात विरोधी पक्षालाही किती प्रतिष्ठा होती, हे सांगताना भास्कर जाधव यांनी एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले, मी काही दिवसांपूर्वीच वाजपेयींचं एक भाषण व यासंदर्भातील लेख वाचला.

जिनेव्हामध्ये एका राष्ट्रीय परिषदेला जगातील नेते होते. तेव्हा पी व्ही नरसिंह राव हे काँग्रेसचे पंतप्रधान होते. पण सत्ताधारी पक्षानं अटल बिहारी वाजपेयींना आपल्या हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून जिनिव्हमध्ये पाठवलं होतं.

त्यावेळेला अटल बिहारी यांना या परिषदेला बघून पाकिस्तान चक्रावून गेला होता. त्यावेळेलाअटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलेल्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत… विरोधी पक्षाचा नेता या बैठकीला कसा आला, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. यावरून वाजपेयींनी स्पष्टीकरण दिलं होतं…

आम्ही राहू अगर राहणार नाहीत…आमचे पक्ष राहतील अगर राहणार नाहीत. पण आमचा देश राहणार आहे. देश टिकवायचा असेल तर ही लोकशाही टिकवली पाहिजे…असं त्या वेळी वाजपेयी म्हणाले होते..

पण भाजपाला लोकशाही संपवायचीच आहे. संविधान संपवून टाकायचं आहे. छोटे पक्ष शिल्लक ठेवायचे नाहीत. अहंकार आणि सत्तेच्या मस्ती आहे. आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे असतील हे सगळे वाचाळवीर आहेत.. महाराष्ट्रात 30-35 वर्ष, बऱ्या वाइट प्रसंगात भाजपाला साथ देण्याची भूमिका शिवसेनेने बजावली आहे, हेही भास्कर जाधव यांनी लक्षात आणून दिलं..

वंचितशी युती योग्यच…

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी शिवसेना ठाकरे गटाची आज युती होणार आहे. यावरून भास्कर जाधव यांनी समाधान व्यक्त केलं. ही युती होण्यास उशीर झाला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी अशाच प्रकारे आपली ताकद वाढवली पाहिजे. छोटे-मोठे गट एकत्र करून विस्तार केला पाहिजे, ही बाब स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.