भिवंडीत काँग्रेस प्रभारी अध्यक्षांविरोधात बंड, 21 नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत

शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी तब्बल नऊ वर्ष विराजमान असलेल्या शोएब खान गुड्डू यांना काँग्रेसने पदमुक्त केले आहे.

भिवंडीत काँग्रेस प्रभारी अध्यक्षांविरोधात बंड, 21 नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत

भिवंडी : शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी तब्बल नऊ वर्ष विराजमान असलेल्या शोएब खान गुड्डू यांना काँग्रेसने पदमुक्त केले आहे. तसेच प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांच्या नियुक्तीची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून नुकतीच करण्यात आली. या घोषणेचे तीव्र पडसाद भिवंडी काँग्रेस वर्तुळात उमटू लागले आहेत. प्रदेश काँग्रेस निर्णयाचा फेरविचार करणार नसल्यास राजीनामा देऊ, अशी भूमिका येथील काँग्रेस नगरसेवक आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. (Bhiwandi Municipal Corporation : 21 corporators prepare for resign against President in charge of Bhiwandi Congress)

भिवंडी महानगरपालिकेत सध्या काँग्रेसचे 47 नगरसेवक असून त्यापैकी 18 नगरसेवकांनी डिसेंबर 2019 मधील महापौर निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांविरोधात मतदान करत बंडखोरी केली होती. त्यानंतर प्रदेश काँग्रेसने भिवंडी शहर अध्यक्ष पदावरून शोएब खान गुड्डू यांना मुक्त केले. परंतु त्याचवेळी प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांच्याकडे सोपवण्यात आला असून त्यास शहरातील काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविण्यास सुरवात केली आहे.

शोएब खान गुड्डू यांची 2012 मध्ये शहर काँग्रेस पदावर नियुक्ती केली होती. तेव्हापासून महानगरपालिका सभागृहात काँग्रेस पक्षाचे संख्याबळ वाढविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शहरात काँग्रेस मजबूत करण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या शोएब खान यांना पदावरून दूर केले. तसेच त्यांच्या जागी प्रभारी म्हणून केलेली नेमणूक ही चुकीची असल्याचा आरोप येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

रशीद ताहीर यांच्याविरोधात काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमथ्ये प्रचंड रोष आहे. त्यांनी नेहमीच काँग्रेसविरोधात भूमिका घेत पक्षाच्या उमेदवारांविरोधात काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची शहरात वाढ न होता अधोगती होणार असून आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला त्याची किंमत मोजावी लागेल. त्यामुळे काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदावरील रशीद ताहीर यांच्या नियुक्तीचा फेरविचार न केल्यास सर्व नगरसेवक काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा नगरसेवक फराज बहाउद्दीन यांनी केली आहे. 29 काँग्रेस नागरसेवकांपैकी 21 जणांनी राजीनामापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस काँग्रेस गटनेते हलीम अन्सारी, नगरसेवक अरुण राऊत, वसीम अन्सारी आणि अनेक नगरसेविकांचे पती उपस्थित होते. दरम्यान प्रदेश काँग्रेस पक्षाने रशीद ताहीर यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून केलेल्या निवडीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नगरसेविका फरजाना इस्माईल रंगरेज यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व भिवंडी महानगरपालिका आयुक्तांकडे सादर केला आहे.

संबंधित बातम्या

सरकारवर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी त्यांचा वकील लावावा : अशोक चव्हाण

काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी बीडमध्ये येऊन गेले; धनंजय मुंडेंचा पंकजाताईंना टोला

(Bhiwandi Municipal Corporation : 21 corporators prepare for resign against President in charge of Bhiwandi Congress)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI