AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादीचा बडा नेता शिंदेंच्या गळाला, शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्यानं पक्षाची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादीचा बडा नेता शिंदेंच्या गळाला, शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी
eknath shinde Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 14, 2026 | 9:55 PM
Share

विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला चांगलं यश मिळालं होतं. भाजपनंतर शिवसेना शिंदे गट हा राज्यात या दोन्ही निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष होता. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटात सुरू झालेली इनकमिंग अजूनही सुरूच आहे. शिवसेना शिंदे गटात सुरू असलेल्या इनकमिंगचा सर्वात जास्त फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचं पहायला मिळालं, शिवसेना ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र आता राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्यानं शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते तसेच पक्षाचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद पराजंपे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये आनंद पराजंपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी दादा भुसे यांनी पक्षाच्या वतीनं आनंद परांजपे यांचं स्वागत केलं. ‘माजी खासदार पराजंपे आज स्वगृही शिवसेनेत परत आलेले आहेत, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे,  त्यांचं मी स्वागत करतो. त्यांना शिवसेना सांगायची गरज नाही, कारण त्यांचा प्रवास शिवसेनेत सुरु झाला होता.’ अशी प्रतिक्रिया यावेळी दादा भुसे यांनी दिली आहे.

दरम्यान आनंद परांजपे यांनी आजच राष्ट्रवादीमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली होती. शेवटी त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आनंद परांजपे हे विधान परिषदेसाठी इच्छुक होते, मात्र विधान परिषदेला संधी न मिळाल्यानं ते पक्षावर नाराज झाले, आणि त्यांनी अखेर राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत त्यांना एखदं मोठं पद मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.